Anushka Sharma | अभिनेत्री अनुष्का शर्माने सांगितली मुलीबद्दलची खास गोष्ट, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anushka Sharma | अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती क्रिकेटपट्टू विराट कोहली (Virat Kohli) आपल्या-आपल्या क्षेत्रात प्रचंड प्रसिद्ध आहेत. 2017 साली त्यांचा विवाह पार पाडला. त्यानंतर यंदाच्या वर्षात अर्थातच 2021 साली त्यांना कन्या प्राप्ती झाली.

 

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहलीने आपल्या मुलीचा चेहरा कॅमेरा पासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याच फोटोंमध्ये त्यांच्या मुलीचा चेहरा पाहायला मिळत नाही. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये या जोडप्याच्या मुलीचं तोंड पाहण्याची मोठी उत्सुक्ता पाहिला मिळते. विराट आणि अनुष्काने मिळून त्यांच्या मुलीचं नाव वामिका (Vamika) असं ठेवलं आहे. एका मुलाखतीमध्ये (Interview) अनुष्काने आपल्या मुलीबद्दल एक खास गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे वामिका प्रचंड निर्धारीत (Determined) असल्याचं अनुष्काने म्हटलं आहे.

 

मुलाखतीमध्ये आपली मुलगी निर्धारित असून तिला एखादी गोष्ट करयाची असेल तर ती काही करुन करतेच असं अनुष्काने सांगितलं आहे. तसेच याबाबत ती अगदी आपल्यावर गेली असल्याचं देखील अनुष्का म्हणाली. आपल्या मुलीचा हा गुण तिला भविष्यात खूप मदत करेल आणि पालक म्हणून आम्ही तिला नेहमीच सहकार्य (Support) करेल असं अनुष्काने मुलाखतीत म्हटलं आहे.

 

अनुष्का आणि विराट नुकतेच टी-20 (T-20 World Cup) वरुन भारतात परतले आहेत.
यावेळी त्यांना स्पाॅट करण्यात आलं होतं.
मात्र यावेळी देखील अनुष्का आपल्या मुलीला बेबी कॅरीअरमध्ये (Baby Carrier) घेऊन चालली असल्याने
तिच्या मुलीचा चेहरा पुन्हा पाहिला मिळाला नाही.
तसेच अनुष्का आणि विराट दोघेही पोज न देताच आपल्या गाडीत बसले.

 

Web Title :- Anushka Sharma | anushka sharma thinks vamika is alot like her says i find her extremely determined

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा