Anushka Sharma | अनुष्काच्या कॅज्युअल लूकवरील फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव; म्हणाले “मनमोहक अदा ….”

पोलीसनामा ऑनलाइन : बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख असणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. अनुष्का शर्माचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात वायरल होत होता. यामध्ये अनुष्काला नेटकऱ्यांनी कपडे सांभाळता न आल्याने ट्रोल देखील केले होते. अनुष्का (Anushka Sharma) सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. नुकतेच तिने तिच्या कॅज्युअल लूक मधील काही फोटो शेअर केले आहेत. यामुळे पुन्हा एकदा अनुष्का चर्चेत आली आहे.
अनुष्काने कुल अँड कॅज्युअल लूकमधील तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अनुष्काने पिवळ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप आणि गोल्डन इयरिंग कॅरी करत केस मोकळे सोडत एकापेक्षा एक लुक देत तिने फोटो शेअर केले आहेत. अनुष्काचे फोटोज नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडत असतात. या फोटोमध्ये देखील अनुष्कावर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे. तर अनुष्काच्या लूकला पसंती दर्शवली आहे.
अनुष्काला इंस्टाग्राम वर जवळपास ६२ मिलियन नेटकरी फॉलो करतात. अनुष्का तिच्या सेटवरील अनेक फोटो
आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. अनुष्का शर्मा चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील
नेहमीच चर्चेत असते. आता अनुष्काच्या चाहत्यांना तिचा आगामी चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’ची ओढ लागली आहे.
हा चित्रपट क्रिकेटर झूलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित असणार आहे.
मध्यंतरी अनुष्काने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
Web Title :- Anushka Sharma | bollywood anushka sharma casual outfit share photo of classy look
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update