आई झाल्यानंतर कसं असेल आयुष्य ? अनुष्का शर्मा म्हणते…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळं चर्चेत आहे. अनुष्का आणि तिचा पती व टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) दोघंही बाळाची आतुरतेनं वाट पाहात आहेत. अनुष्कानं 2021 मध्ये म्हणजेच नवीन वर्षात त्यांच्या घरी बाळाचं आगमन होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत अनुष्कानं सांगितंल हे की, आई झाल्यानंतर तिचं आयुष्य कसं असेल. याशिवाय तिनं तिच्या कामाबद्दलही यावेळी भाष्य केलं आहे.

मुलाखतीत बोलताना अनुष्का म्हणाली, आई झाल्यानंतर लगेचच मी शूटिंगवर वापसी करणार आहे. एक अशी सिस्टिम निश्चित करेन ज्यात माझं बाळ, घर आणि काम यांच्या संतुलन राहील. मी जिवंत आहे तोवर कम रत राहीन. कारण अ‍ॅक्टिंगमुळं मला खूप आनंद मिळतो असंही तिनं सांगितलं आहे.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. याशिवाय तिनं प्रोड्युस केलेला बुलबुल हा सिनेमाही नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे, ज्याला चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळालं. अ‍ॅक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहेत. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.

You might also like