अनुष्का की दीपिका, कोण जास्त हॉट ? प्रश्नावर जसप्रीत बुमरा ‘क्लिन’बोल्ड

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भारताने नुकतीच विंडीजविरुद्धची कसोटी मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅंपियनशिपमध्ये विजयाने सुरुवात केली आहे. त्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावरून आलेल्या भारताचा  वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर तो चांगलाच बुचकळ्यात पडला. या मुलाखतीमध्ये त्याला अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोण यांच्यात कोण हॉट आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने काय उत्तर दिले पहा.

या मुलाखतीत त्याला हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर तो काही काळ शांत राहिला. त्यानंतर त्याला पुन्हा हा प्रश्न विचारण्यात आला, मात्र त्याने तरीदेखील कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर त्याला अनुष्का शर्मा कोण आहे, हे तुला माहितीच असेल ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर त्याने उत्तर देताना म्हटले कि, तुम्ही दिलेले पर्याय सुरक्षित नाहीत. त्यानंतर त्याला आलिया आणि परिणीती चोप्रा यांच्यात कोण हॉट आहे असे विचारले असता त्याने सांगितले कि, मी आलिया भटचे पाहू सिनेमे आणि फोटो पहिले आहेत. अशाप्रकारे त्याने आपली या प्रश्नातून सुटका करून घेतली.

दरम्यान, बुमरा सध्या तुफान फॉर्ममध्ये असून नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेनंतर त्याने गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत  पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले असून सध्या तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कसोटी मालिकेत त्याने महत्वाच्या विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली होती.

You might also like