आता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे. २०१८ मध्ये आनंद एल राय यांचा चित्रपट ‘जीरो’ मध्ये दिसल्यानंतर तिने कोणताच चित्रपट साइन केला नाही. याच दरम्यान तिने चित्रपटातून ब्रेक घेऊन विराट कोहलीसोबत वेळ घालवला. आता लवकरच ती वापसी करणार आहे. फिल्ममेकरच्या रिपोर्टनूसार, अनुष्काने दोन दिवसांपुर्वी २० जुलैला आपल्या इन्स्टाग्रामवर याची घोषणा केली होती.

रिपोर्टने दिलेल्या माहितीनूसार, अनुष्का शर्मा आपल्या प्रोडक्शन हाउस क्लीन स्लेट फिल्म बॅनरद्वारे ‘माई’ नावाची वेब सीरीज घेऊन येणार आहे. ही वेब सीरीज एक मध्यम वर्गीय महिलेच्या आधारावर असणार आहे. जी चुकून कुख्यात माफिया लीडरला मारून टाकते. जसजशी वेळ निघून जात होते तसतशी ती फसत जात होते. या वेब सीरीजला अतुल मोंगिया, तमाल सेन आणि अमित व्यासने लिहले आहे.

भलेही अनुष्का शर्मा सीरीज मध्ये दिसणार नाही पण ती इंडस्ट्रीव्यतिरिक्त आपल्या साइड प्रोजेक्ट्सला घेऊन अ‍ॅक्टिव्ह असते. अपेक्षा आहे की, अनुष्का लवकरच सिल्वर स्क्रिनवर वापसी करेल.

मागील काही दिवसांपासून अनुष्का शर्मा क्रिकेट वर्ल्ड कपच्या दरम्यान पति विराट कोहलीसोबतच्या फोटोंमुळे चर्चेमध्ये आली होती. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर लंडनमधील काही फोटो शेअर केले होते. अनुष्का शर्मा ‘जीरो’ चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटामध्ये तिच्या व्यतिरिक्त शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ दिसून आले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करु शकला नाही. प्रेक्षकांचा या चित्रपटाला रिस्पॉन्स मिळाला नाही.

आरोग्यविषयक वृत्त