विराट-अनुष्काने लग्नाबाबत अशी राखली गुप्तता 

मुंबई : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी २०१७ मध्ये  विवाह केला. त्यांच्या या लग्नाविषयी माहिती त्यांचं लग्न झाल्यावरच सगळ्यांच्या समोर आली. विराट-अनुष्काने  इटलीत अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. या विवाहसोहळ्यात केवळ मित्रपरिवार आणि जवळची मंडळी उपस्थित होती. त्यांच्या लग्नाची बातमी अचानकपणे समोर आल्याने अनेक जण आश्चर्यचकित झाले होते. या लग्नाविषयी दोघांनीही कमालीची गोपनियता पाळली होती. हे सर्व कशाप्रकारे पार पाडलं याबाबत नुकतंच अनुष्काने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

विराट-अनुष्काच्या लग्नाबाबतची माहिती केवळ कुटुंबीय, जवळचे मित्रमंडळी आणि त्यांच्या व्यतिरिक्त वेडिंग प्लॅनर, अनुष्काच्या मॅनेजर आणि स्टायलिस्टला माहिती होती. या लग्नासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनरने दोघांचे कपडे डिझाइन केले होते. त्यांच्यासोबतच्या भेटीबाबतची माहितीही गुप्त ठेवण्यात आली होती. ‘केटररशी बोलतानाही आम्ही आमची खोटी नावं सांगितली होती. विराटने त्याचं नाव राहुल सांगितलं होतं,’ असं अनुष्काने यावेळी सांगितलं.

प्रसारमाध्यमं आणि सिने इंडस्ट्रीपासून दूर अशा ठिकाणी लग्न केल्यामागचं कारण सांगताना अनुष्का म्हणाली, ‘मोठे सेलिब्रिटी म्हणून नाही तर आम्हाला विराट आणि अनुष्का म्हणून हे लग्न पार पाडायचं होतं. आमच्या लग्नाला फक्त ४२ लोकं उपस्थित होते. यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी होती. असं ही अनुष्का यावेळी म्हणाली.

Loading...
You might also like