‘या’ गंभीर आजाराशी लढत असतानाही अनुष्का World Cup मध्ये असणार विराटसोबत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काही दिवसांपासून एका मोठ्या आजाराने त्रस्त आहे. सध्या काही दिवसांमध्ये तिचे सोशल मीडियावर फोटोज व्हायरल होत आहेत. ज्या मध्ये ती क्लिनिकच्या बाहेर दिसते आहे. अनुष्काला हा आजार खूप दिवसांपासून आहे पण ती आज काल तिच्या त्रासाला घेऊन खूपच चिंताग्रस्त आहे. मीडिया रिपोर्टच्यानुसार अनुष्का बल्जिंग डिस्क नावाच्या आजारने त्रस्त आहे. या आजारात कंबरेच्या हाडात त्रास होतो आणि बसता येत नाही. जो व्यक्ती एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहतो तो त्या आजाराचा बळी होतो.

आजारी असूनही, अनुष्का शर्मा 30 मेपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी विराट कोहलीला साथ देणार आहे. अनुष्काची अशी इच्छा आहे कि तिच्या आजारामुळे विराटाचे क्रिकेट पासून दुर्लक्ष नको व्हायला आणि त्याचा परफॉर्मेंस कमी झाला नाही पाहिजे. काही दिवसांपूर्वी अनुष्काने सांगितले होते की, ती का चांगल्या चित्रपटांपासून हात काढून घेते आहे. कारण चांगल्या रोलसाठी आपल्याला बसून निर्णय घ्यावा लागतो. मला वाटते की मी त्या क्षणी पोहोचली आहे जेथे खानपुत्रतीसाठी चित्रपटांवर साइन केली जाऊ शकत नाही.

अनुष्काने सांगितले की आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी काही शो बनवतो आहोत. एका चित्रपटावरही माझे काम चालू आहे. या गोष्टींना देखील माझी गरज आहे. माझ्यासाठी ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. खूप वेळा काही लोकांना माहिती पण नसते जे मी पडद्याच्या मागे काम करत असते. अनुष्काचे म्हणणे आहे की ती तिच्या कामावर फोकस करू इच्छिते आहे. या व्यतिरिक्त, मी काय केले ते देखील पाहू इच्छिते. मी माझ्या कामात पूर्णपणे समाधानी आहे आणि मी नेहमी जे हवे तेच करते.

Loading...
You might also like