कोणतही काम करण्यापूर्वी ‘या’ बाबांचं मत घेते अनुष्का शर्मा ! जाणून घ्या कोण आहेत ते ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार अनुष्का शर्माला सारेच ओळखतात. परंतु आज आपण तिच्याबद्दल काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत. अनुष्का एका बाबांना खूप मानते ते कोण आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अनुष्काचा धर्मावर आणि देवावर खूप विश्वास आहे. पती विराट कोहलीनंही एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की, अनुष्कासोबत लग्न करून तो खूप धार्मिक प्रवृत्तीचा झाला आहे.

अनुष्का शर्मा हरिद्वारला राहणाऱ्या अनंत बाबा यांना खूप मानते. अनुष्का अनंत बाबांना विचारूनच सर्व कामे करते. अनुष्कानं जेव्हा लग्न केलं तेव्हा अनंत बाबांनीच लग्नाचे सर्व विधी केले होते.

अनंत बाबा हरिद्वरा येथील एका आश्रमात राहतात. या आश्रमाचं नाव आहे अनंत धाम. अनुष्काला जेव्हा कधी शांती हवी असते ती तिथच जाते आण काही काळ घालवते. काही काळ तिथं राहिल्यानंतर ती परत येते.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. याशिवाय तिची बुलबुल सीरिजही रिलीज झाली आहे. अॅक्टींगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like