रणवीर सिंग, अमिताभ बच्चनसह ‘या’ टॉपच्या कलाकारांना लुकमुळे नव्हते मिळत सिनेमात काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड मधील एक काळ असा होता की, जेव्हा हेवी वेट यंगस्टर्सही हिरो बनण्यासाठी येत असत आणि त्यांना त्यांच्या अभिनयाच्या जोरावर कामही मिळत होतं. नंतर नंतर सिनेजगताची परिस्थिती सुधारली  आणि कलाकारांमध्ये अनेक गुण वैशिष्ट्ये शोधली जाऊ लागली. जसं की हाईट, सुंदर चेहरा आणि पिळदार शरीर. या डिमांडमुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकांना याचा त्रासही झाला. यापैकी एक म्हणजे अनुष्का शर्मा. अनुष्का उद्या आपला 31 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आपण अशा स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत जे त्यांच्या लुकमुळे रिजेक्ट झाले होते.
रणवीर सिंग- बॉलिवूडमधील टॉपवर असणारा रणवीर सिंगला उत्तर भारतीय चेहरा समजून सिनेमातून रिजेक्ट केलं जायचं. आज पाहिलं तर रणवीर सिंगच्या खात्यात अनेक अवार्ड्स आहेत आणि शिवाय तो बॉलिवूडचा खिलजी आणि सिम्बा मानला जातो.
अजय देवगण– बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगणलाही रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. खरेतर अजयचे स्क्रिन कॉम्प्लेक्शन खूप डार्क असल्या कारणाने त्याला सुरुवातीच्या काळात सिनेमा मिळतच नव्हता.
शाहरुख खान-  बॉलिवूडचा बादशाह, किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान याने छोट्या पडद्यापासून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.  आज अख्ख्या जगाला शाहरुखचे वेडे आहे. परंतु एक काळ असा होता जेव्हा शाहरुखलाही त्याच्या लुकवरून रिजेक्ट करण्यात आलं होतं.
अमिताभ बच्चन- तुम्हाला वाचून विश्वासच बसणार नाही की, या यादीत बॉलिवूडचे  शहंशाह आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. अमिताभ बच्चन यांनीही आपल्या बॉलिवूडमधील करिअरमध्ये खूप वाईट काळदेखील पाहिला आहे. अमिताभ बच्चन यांना त्यांची उंची आणि आवाजामुळे सिनेमे मिळत नसत. त्यांना बॉलिवूडमध्ये नाव कमवायला तब्बल 8 वर्षे संघर्ष करावा लागला.
Loading...
You might also like