महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी अनुष्का उभारणार पशुवैद्यकीय रुग्णालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तसेच भटक्या, पाळीव प्राण्यांसाठी ती निवारा देखील बांधणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती रुग्नालया बांधण्याच्या तयारीत होती. तिने रत्नागिरीतील एका गावात जागा घेतली होती मात्र २०१६ पासून या जागेवरून वाद सुरू आहेत. आता तिला रुग्णालय बांधण्यासाठी हिरवा कंदील मिळाला असून लवकरच रुग्णालयाचं काम सुरू होणार असल्याचं समजत आहे.

त्या जागेचा वाद अखेर मिटला

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार अनुष्काला पशुवैद्यकीय रुग्णालय तसेच भटक्या, पाळीव प्राण्यांसाठी निवारा उभारायचा आहे. याच रुग्णालयाच्या शेजारी तिला वडिलांसाठी घरही बांधायचं आहे. मात्र काही कारणांमुळे ही जागा वादात सापडली होती आता मात्र या जागेचा वाद मिटला असून लवकरच रुग्णालयाच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. अनुष्काचे वडिल रुग्णालयाचं व्यवस्थापन पाहतील असं समजत आहे. अनुष्कानं तिच्या अधात्मिक गुरूंच्या सल्ल्यावरून प्राण्यांसाठी निवारा उभारण्याचं ठरवलं असल्याचंही सुत्रांकडून समजत आहे.

अनुष्काचं प्राणीप्रेम हे सर्वश्रुत आहे. प्रत्येक जीवाचं मोल आहे कोणत्याही प्राण्याला आपण ईजा पोहोचू नये या मताची ती आहे. प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेनं अनुष्काला २०१७ मध्ये ‘पेटा पर्सन ऑफ द इअर’चा किताबही दिला होता.

Loading...
You might also like