अभिनेत्री अनुष्कानं सांगितलं विराटनं केलेल्या पहिल्या ‘KISS’ बाबत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली सध्या वर्ल्ड कप मध्ये व्यस्त आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अनुष्का शर्माही इंग्लंडमध्ये उपस्थित आहे. अशातच अनुष्काने विराटला घेऊन काही खुलासे केले आहेत. त्यांच्या भेटीपासून तर विराटने पहिल्यांदा तिला किस करण्यापर्यंत सर्वकाही खुलासे अनुष्काने केले आहेत. अनुष्काने सांगितले आहे की, “२०१३ नंतर आमच्या भेटीला सुरुवात झाली होती. आम्ही पहिल्यांदा एका जाहिरातीदरम्यान भेटलो होतो.”

Anushka Sharma

पुढे आणखी माहिती देताना अनुष्काने सांगितले की, “या जाहिरातीदरम्यानच आमची मैत्री झाली. आमची मैत्री हळूहळू वाढत गेली. हळूहळू आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या. काही दिवसांनंतर आम्ही लंचदेखील सोबत करू लागलो. सेलिब्रिटी असल्याने आम्ही नेहमीच मीडियापासून वाचून रहायचो.”

 Anushka Sharma

पुढे अनुष्का म्हणते की, “जानेवारी २०१४ मध्ये जेव्हा टीम इंडिया आपला दक्षिण अफ्रिकेचा दौरा पूर्ण करून मुंबई विमानतळावर पोहोचली होती तेव्हा सर्वांचं ध्यान यावर केंद्रीत झालं होतं की, विराट थेट माझ्या घरी आला होता. विराट मला सरप्राईज देण्यासाठी माझ्या सिनेमाच्या सेटवर यायचा. त्यानंतर आम्हाला जाणवू लागलं की, आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत. फक्त एवढंच की आम्हाला हे खूप नंतर जाणवलं.”
 Anushka Sharma

विराटबाबत आणखी काही खुलासे करताना अनुष्का म्हणते की, “अशातच एकदा मॅचदरम्यान मी प्रेक्षकांमध्ये बसले होते आणि विराट खेळत होता. त्यावेळी मला त्याने किस केला. त्याचवेळी बहुतेक सर्व अफवांवर शिक्कामोर्तब झालं. यानंतर सर्वांनाच आमच्या नात्याबद्दल कळाले.”
 Anushka Sharma