ही अभिनेत्री करणार जयललितांच्या बायोपिकमध्ये काम 

मुंबई : वृत्तसंस्था 
सध्या बॉलीवूडमध्ये बीओपीकचा ट्रेंड आहे. त्यामध्ये आता जयललिता यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची भर पडणार आहे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित ‘अम्मा’ या चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी अनुष्का शेट्टीला विचारण्यात आले आहे. अनुष्काशिवाय ऐश्‍वर्या राय-बच्चनचेही नाव या भूमिकेसाठी आघाडीवर आहे. जयललिता यांचे सहकलाकार आणि राजकीय गुरू अभिनेते एमजीआर यांच्या भूमिकेसाठी कमल हसन किंवा मोहनलाल या दिग्गज अभिनेत्यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’76686d02-bd6d-11e8-9c17-b9ad6ebfbfd4′]

जयललिता याचं निधन ५ डिसेंबर २०१६ मध्ये चेन्नईत झाले. तामिळनाडूमधील राजकारण अनेक वर्षें जयललिता यांच्याभोवती फिरत होते. त्यामुळे जयललिता यांच्यावरील चित्रपटाला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभेल, यात शंका नाही.राष्ट्रीय पुरस्कार विजेते पी. भारती राजा आणि निर्माते आदित्य भारद्वाज हे दोघे मिळून ‘अम्मा’ चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे संगीत इलयराजा देणार आहेत. डिसेंबरपर्यंत या सिनेमाची शूटिंगही सुरू होणार आहे.

एकतर्फी प्रेमातून माथेफिरुनी केलेल्या हल्यात मुलीचा मृत्यू