प्रभास बद्दल अनुष्का शेट्टीचं मोठं वक्तव्य, म्हणाली – ‘सिनेमा सोडेल पण त्यांना नाही सोडणार’

पोलीसनामा ऑनलाईन :बाहुबली सिनेमानंतर अभिनेता प्रभास आणि अनुष्का शेट्टी जगभर फेमस झाले. एसएस राजामौलीनं या सिनेमातून वेगळाच इतिहास रचला. या सिनेमानं कमाईच्याबाबतीतही अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या सिनेमानंतर प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरच्या चर्चा समोर येताना दिसल्या. अशाही बातम्या समोर येताना दिसल्या की, दोघंही लवकरच लग्न करणार आहेत. या सगळ्यानंतर आता अनुष्का शेट्टीनं प्रभास आणि तिच्या रिलेशनशिपच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

https://www.instagram.com/p/B94tX2qBEAv/?utm_source=ig_embed

एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात अनुष्काला प्रश्न विचारला जातो की प्रभास आणि अॅक्टींग यामध्ये एकाची निवड करायची असेल तर कोणाची करशील. यावर उत्तर देताना अनुष्का म्हणाली की, करिअरला सोडेल परंतु करिअरसाठी प्रभासला नाही सोडू शकत.

अनुष्काचा हा व्हिडीओ अलीकडेच ई टीव्हीवर झालेल्या तिच्या मुलाखतीचा आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, जर तुला या दोनपैकी एकाची निवड करायची असेल तर काय निवडशील. यातील दोन पर्याय असे आहेत एक प्रभाससोबतची मैत्री आणि दुसरा आहे अभिनय. यावर उत्तर देताना अनुष्का म्हणाली, “मी सिनेमात काम करणं सोडेल. आपल्या कामासाठी मी प्रभाससोबतची मैत्री तोडू शकत नाही.” अनुष्काचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.