‘या’ तारखेला बाळाला जन्म देणार अनुष्का ! खुद्द विराटनंच जाहीर केली ‘Delivery Date’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळं चर्चेत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अनुष्का दोघंही बाळाची आतुरतेनं वाट पहात आहेत. सध्या विराट आयपीएलसाठी युएईमध्ये आहे. अनुष्कानं 2021 मध्ये म्हणजेच नवीन वर्षात त्यांच्या घरी बाळाचं आगमन होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. चाहत्यांनी कपलला खूप शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर आता विराटनं अनुष्काची डिलिव्हरी डेट सांगितली आहे.

एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, विराटनं एका मुलाखतीत अनुष्काची डिलिव्हरी डेट सांगितली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या ऑफिशियल युट्युब चॅनलवर मुलाखत देताना विराटनं 10 नोव्हेंबर रोजी बाळाचा जन्म होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. पहिल्यांदाच विराटनं अशा प्रकारे डिलिव्हरी डेट सांगितल्यानं या व्हिडीओनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

View this post on Instagram

Pocketful of sunshine ☀️☺️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

विराटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. इतकंच नाही तर बाळाच्या जन्माची तारीख वाचून त्या पोस्टला अवघ्या 2 मिनिटात 1627 लाईक्स आले होते. मात्र काही कारणामुळं हा व्हिडीओ नंतर डिलीट करण्यात आला. अनुष्का आणि विराटनं डिसेंबर 2017 इटलीत लग्न केलं होतं. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं ते कायमच चर्चेत असतात.

View this post on Instagram

❤️🌅 pic credit – @abdevilliers17 😃

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

 

 

You might also like