सलमानच्या या चित्रपटात दिसणार नाही अनुष्का. 

मुंबई : वृत्तसंस्था – संजय लीला भन्साळी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. सलमान या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत आहे. आगामी चित्रपटात अनुष्का सलमान सोबत दिसणार असल्याची चर्चा सर्वत्र होती. ‘दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर  संजय लीला भन्साळी एकत्र चित्रपट करत आहेत. यामुळे सगळ्यांनाच या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. मात्र, अनुष्काच्या प्रवक्त्यांनी अशा  सिनेमाबाबत कोणताही करार झालेला नाही हे सांगितले आहे. बॉलिवूडमधील ‘पद्मावत, ‘राम- लीला, ‘बाजीराव- मस्तानी, ‘देवदास, अशा हिट चित्रपटांसाठी संजय लीला भन्साळी ओळखले जातात.

सलमानने या सिनेमासाठी अनुष्काचे नाव सुचवलं असल्याची चर्चा होती. अनुष्काला देखील भन्साळींसोबत काम करायला आवडेल मात्र, अद्याप अनुष्काने या चित्रपटात कोणताही करार केला नसल्याचे समजत आहे. भन्साळी यांच्याकडून कोणतीही विचारणा झालेली नाही. ‘ सुलतान’ या चित्रपटात सलमान व अनुष्का दोघे एकत्र दिसत होते व त्या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पंसंतीस उतरली होती.

अनुष्का सध्या ‘झिरो’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या नवीन चित्रपटात अनुष्का, कतरीना कैफ व अनुष्का एकत्र दिसणार आहे. ‘जब तकी है जान’ या चित्रपटात ते तिघे एकत्र दिसले होते. २१ तारखेला ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

You might also like