इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास CID कडे, : गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन-  अन्वय नाईक व त्यांच्या आई कुंमुद नाईक यांनी मे २०१८ यांनी संशयास्पदरित्या आत्महत्या केली होती. या संदर्भाल अलीबाग पोलिस स्टेशनला गुन्हाची नोंद  करण्यात आली होती. या प्रकरणाचा योग्य तपास झाला नसून या प्रकरणाचा फेरतपास व्हावा अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देवून अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी केली होती. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी ही राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) कडे देवून फेरतपास करण्यात येणार असल्याची माहीती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.


अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास हा अलीबाग पोलिसांनी केला होता. या प्रकरणात अलीबाग पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५९/२०१८, भादंवि ३०६,३४ प्रमाणे तसेच गु.र.नं. ११४/२०१८ भांदवि कलम ३०२ प्रमाणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांच्या मुलीने अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या वडीलांच्या कामाचे पैसे न दिल्याने त्यांचे वडील व आजीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. दरम्यान करण्यात आलेल्या तपासापासुन आपण असमाधानी असल्याने गुन्हेगारी प्रक्रिया संहीता (सि.आर.पी.सी) मधील कलम १७३ (८) मधील अधिकाराचा वापर करुन हे प्रकरण राज्य अन्वेषण विभाग अथवा गुन्हे शाखेकडे वर्ग करावे. तसेच तत्कालीन संबंधित तपास अधिकारी व इतर शासकीय अधिकारी / न्यायीक अधिकारी यांचे विरुध्द चौकशी करण्यात यावी, अशी विनंती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गुहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातुन केली होती.

या संदर्भात शासनाने मंगळवार दि. २६ मे ला निर्णय घेवून अलिबाग पोलिस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. ५९/२०१८ व गु.र.नं. ११४/२०१८ चा फेरतपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याबाबत पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व अपर पोलिस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांना आदेश देण्यात आले असून या संपुर्ण प्रकरणाचा फेरतपास होणार असल्याची माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like