‘क्रिकेट’ आणि ‘राजकारणात’ काहीही होऊ शकतं, नितीन गडकरींचे ‘सूचक’ विधान

नवी दिल्ली : वृत्त संस्था – क्रिकेट आणि राजकारण यामध्ये काहीही होऊ शकते़ कधी कधी आता मॅच हारणार असे वाटत असताना नेमका उलटा निकाल लागत असतो, अशी टिपण्णी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या राजकारणानंतर ते दिल्ली आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितीन गडकरी हे आज पुण्यात विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी पुण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेमध्ये पुढाकार घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गडकरी यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी मुंबईत येऊन त्यासंबंधी चर्चाही केली होती. गडकरी यांनी सांगितले की, राज्यात जरीभाजपाविरहीत सरकार आले तरी भाजपा सरकारने सुरु केलेल्या योजनांवर काहीही परिणाम होणार नाही. आपल्या लोकशाहीत सरकार बदलले जाते. पण, प्रकल्प सुरु राहतात. त्यामुळे कोणतेही सरकार आले तरी सकारात्मक निती आणि विकास योजना पुढेही चालूच राहतील.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like