राज ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘राजकारणात काहीही घडू शकतं’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या राजकारणात शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का ? हा प्रश्न सर्वांच्या भावनिक जिव्हाळ्याचा होऊन बसला आहे. राज ठाकरे यांना मंगळवारी (दि. 1) एका वेबिनारमध्ये पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत परमेश्वरालाच ठाऊक असे उत्तर दिले होते.

राज यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का ? हा प्रश्नच मला आशावादी वाटत नाही. त्यांना हा प्रश्न का विचारला, त्यावर त्यांनी का उत्तर दिल ? हे त्यांनाच माहीत, असे सावंत यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्यापूर्वी अन् नंतरही अशा चर्चा होतात. सगळ्याच गोष्टी भविष्यात बघितल्या जातील, असे सावंत यांनी म्हटले आहे. तसेच समाजकारण आणि राजकारणात काहीही घडू शकते असे विधानही सावंत यांनी केले आहे.


कोणताही पक्ष हा केवळ नेत्यामुळे नसतो. कार्यकर्त्यांचे जाळे हे महत्त्वाचे असते. नेत्यावरून पक्ष ओळखला जात नाही तर पक्षामुळे नेत्याची ओळख होते. नेत्याकडे बघून जरूर मतदान होते. पण शेवटी पक्षाची ताकद महत्त्वाची असते. मोदींकडे बघून लोक भाजपला मतदान करतात, पण शेवटी भाजपची संघटनात्मक ताकद आहेच. राज ठाकरे यांचे जे काही नेतृत्व आहे ते मनसेमुळे आहे. मनसे म्हणजे राज ठाकरे नव्हे तर मनसेमुळे राज ठाकरे आहे. (Shivsena)

टाचांच्या भेगांनी त्रस्त आहात तर मग ‘या’ टिप्स फोलो करा; जाणून घ्या

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील युतीबाबत राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी सध्या तुमच्या हातात काहीच नाही. त्यामुळे खरच काही सांगता येत नाही. राज्यात सध्या नेमक कोण राजकीय विरोधक आणि कोण मित्र हेच कळत नाही. कोण कुठल्या बिळातून बाहेर येईल हे समजत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू, असे ठाकरे म्हणाले. निवडणुका येईपर्यंत मनसेची वाटचाल एक पक्ष म्हणून असेल आणि हा मला डोळा मारतोय का, तो पत्र पाठवतोय का, यावर माझी वाटचाल असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. (Shivsena)

READ ALSO THIS :

 

Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद येथून अटक; आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा केला होता प्रयत्न

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; जिल्हा व नागरी बँकांच्या अस्तित्वासाठी टास्क फोर्स