आंध्रप्रदेश: AP Crime News | विशाखापट्टणममध्ये एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरशी लग्न झालेली अनुषा येत्या काही दिवसांत बाळाला जन्म देणार होती. नवरा-बायकोमध्ये कशावरून तरी वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की ज्ञानेश्वरने अनुषाचा जीवच घेतला.
अधिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर स्केप्समधील सागर नगर व्ह्यू पॉइंटजवळ फास्ट-फूडचा व्यवसाय करतो. आज सकाळी त्याने त्याच्या मित्रांना सांगितले की, अनुषा आजारी आहे. नातेवाईक आणि मित्रांनी अनुषाला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत पत्नी अनुषाची हत्या केल्याचे ज्ञानेश्वरने कबूल केले आहे. अनुषाच्या आईने आणि मैत्रिणींनी ज्ञानेश्वरला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.