एकमेकांच्या सैन्य सुविधेचा करू शकतात वापर, भारत-जपानमध्ये झाला करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि जपान यांनी करार केला आहे. ज्यानुसार दोन्ही देशांचे सैन्य सप्लाय व सर्विससाठी एकमेकांचे बेेस वापरू शकतात. भारतीय संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अलिकडच्या वर्षांत दोन्ही देशांमध्ये संरक्षण कराराच्या संदर्भात जवळील वाढली आहे. विश्लेषकांनी याला या क्षेत्रात चीनचा वाढता हस्तक्षेप संपविण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.