खळबळजनक ! महिला पोलिसाकडून सहायक निरीक्षकाचा (API) गोळ्या झाडून खून, त्यानंतर कुशीत बसून…

राजकोट : वृत्तसंस्था – महिला पोलीस कॉन्स्टेबलने सहायक पोलीस निरीक्षकाचा गोळ्या झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सहायक पोलीस निरीक्षकाचा खून केल्यानंतर तिने त्याच्या कुशीत बसून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार गुजरातमध्ये गुरुवारी (दि.११ जुलै) रोजी घडला आहे.

रविराज जडेजा असे खून झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. तर खुशबू कानाबार असे आत्महत्या केलेल्या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला. तपासादरम्यान खळबजनक माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

रविराज आणि खुशबू हे दोघे राजकोट शहरातील युनिर्व्हसिटी पोलीस ठाण्यात कार्य़रत होते. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला. त्यावेळी रविने खुशबूचा खून करून त्यानंतर स्वत: आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तपासादरम्यान उलटीच माहिती समोर आली. रविचे आणि खुशबूचे विवाहबाह्य संबध होते. खुशबूला रवीसोबत लग्न करून संसार थाटण्याची इच्छा होती. मात्र, रविचे लग्न झाले असून त्याला दोन मुलं असल्याने त्याला खुशबूसोबत लग्न करणे अशक्य होते.

दरम्यान, दोघांचेही मृतदेह गुरुवारी एका खोलीत आढळून आले होते. खुशबू कानाबार हिने आगोदर रविराज याचा खून केला. त्यानंतर त्याच्या कुशीत बसून स्वत: आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

Loading...
You might also like