जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

जेजुरी(संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन  –  कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत कोरोना संकटापासून नागरिकांना सुरक्षित ठेवून, मजूर,परप्रांतीय,बेघर यांना संकटाच्या काळात आधार देऊन कोरोना योद्धा ठरलेले जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना जेजुरी येथे कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

सावंत प्रतिष्ठानच्या वतीने सलग वीस वर्षे सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो . यंदाचा हा विशेष पुरस्कार दोन वेळा राष्ट्रपती पोलीस शौर्य पुरस्कार प्राप्त, तसेच कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात चौदाशे परप्रांतीय,मजूर,बेघर, अनाथ यांची उपासमार होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप करून त्यांना आधार देणारे जेजुरी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला .

यावेळी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे, माजी जेष्ठ नगरसेवक रमेश गावडे,नगरसेवक महेश दरेकर,बाळासाहेब सातभाई,गणेश शिंदे, अजिंक्य देशमुख,रुक्मिणी जगताप, जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे, कार्याध्यक्ष रवींद्र जोशी, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे,अनंत देशमुख, प्रतिष्ठानचे सचिव संजय सावंत, सनी कुंभार,अमोल शिंदे,निलेश जगताप, तानाजी झगडे, जॉनटी राऊत आदी उपस्थित होते .

यावेळी बोलताना नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी जेजुरी सारख्या तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी यात्रा,जत्रांचे नियोजन, सर्व घटकांना एकत्र घेऊन सामाजिक ऐक्य निर्माण करून कोरोना संकटाच्या काळात सामान्य माणसांना आधार देण्याचे काम अंकुश माने यांनी केले असे सांगितले .

जीमाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे यांनी कायद्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसांशी माणुसकीने वागणारे,उपेक्षित असणाऱ्या परप्रांतीयांची उपासमार होऊ नये यासाठी दोन महिने आधार देणारे, आणि किशोर वयीन युवक युवतीचे समुपदेशन करणारे साह्ययक पोलीस निरीक्षक अंकुश माने हे पोलिसातील देवमाणूस आहेत असे यावेळी सांगितले.

माजी जेष्ठ नगरसेवक रमेश राऊत, अंकुश माने यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन जेजुरी देवसंस्थान चे माजी विश्वस्त नितीन राऊत तर आभार निलेश जगताप यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे सचिव संजय सावंत,मयूर सावंत,संतोष सावंत, अतुल सावंत आदींनी केले .