दरोड्यातील आरोपींना जेरबंद करणाऱ्या API हनुमंत गायकवाड यांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते ‘सन्मान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – चार महिन्यांपूर्वी घडलेल्या दरोडा सारख्या गंभीर प्रकरणामध्ये गुन्ह्याचा कुठलाही धागादोरा हाती नसताना मोठ्या शिताफीने तपास करून त्या गुन्ह्यातील ७ आरोपींना शोधून काढून त्यांच्याकडून साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करत त्यांना जेरबंद करणाऱ्या जाबाज सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या कार्याचा गौरव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.सुहास वारके आणि सातारा च्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.

चार महिन्यांपूर्वी खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि. ३९५, ३९७, ३४२ हा गुन्हा नोंद झाला होता या गुन्ह्यामध्ये सुमारे ८ लाख ५० हजारांचा माल चोरीला गेला होता. Api गायकवाड यांनी त्याचे धागेदोरे शोधून काढत ७ आरोपींना पुणे जिल्ह्यातून वर्ग करून घेऊन त्यांच्या कडून मोठ्या शिताफीने वरील मुद्देमाल हस्तगत केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे मूळ दौंड तालुक्यातील केडगाव येथील रहिवासी असून त्यांच्या गुणगौरवाने केडगाव परिसरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हनुमंत गायकवाड हे मोठ्या बिकट परिस्थिवर मात करत पोलीस दलामध्ये भरती झाले होते. काही काळातच त्यांनी खात्यांतर्गत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास होत पोलीस उपनिरीक्षक बनले. त्यांनी उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर आज सहायक पोलिस निरीक्षक पदापर्यंत मजल मारली असून त्यांची अशीच प्रगती होत राहो अश्या शुभेच्छा दौंडकरांकडून देण्यात येत आहेत.

You might also like