खळबळजनक ! सहायक पोलिस निरीक्षकाची (API) गळफास घेऊन आत्महत्या

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – अलिबाग पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहात एका पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रशांत कणेरकर यांची ३ महिन्यांपूर्वी रायगड पोलीस दलात बदली झाली होती. ते अलिबाग पोलीस मुख्यालयात अर्ज शाखेत रुजू झाले होते. त्यानंतर ते काही दिवस रजेवर गेले होते. त्यानंतर ते १५ ऑगस्टला पुन्हा कामावर हजर झाले. शुक्रवारी सायंकाळी ते अलिबाग पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहात आले. त्यानंतर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. रात्री विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजविला. परंतु, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने कर्मचाऱ्याने आत पाहिले असता कणेरकर यांनी गळफास घेतल्याचे दिसले. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली आढळून आले नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्यामागे कामाचा ताण की आणखी काही कारण आहे, याची माहिती मिळू शकली नाही.

प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like