API To PI Promotion News : राज्यातील 438 सहाय्यक निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी बढती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्य पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षकांना आज (मंगळवार) पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. गृहविभागाने आज हे आदेश दिले आहेत. त्यात राज्यातील 438 सहायक पोलीस निरीक्षकांना ही पदोन्नती मिळाली आहे.

त्यात पुणे, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड शहरातील बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे. कंक्षात सध्याचे ठिकाण व बदली झालेला घटक.

राजू पाचोरकर (गुन्हे अन्वेषण विभाग ते नाशिक), चंद्रकांत सूर्यवंशी (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे), सुरेंद्र धुमाळे (पुणे ते गुन्हे अन्वेषण विभाग), चंद्रकांत वाबळे (पुणे ते सोलापूर शहर), सुधीर चव्हाण (पिंपरी चिंचवड ते मीरा भाईंदर), सुनील गवळी (पुणे शहर ते टीआरटीआय पुणे), गोविंद जाधव (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग), मिलिंद साबळे (पुणे ग्रामीण ते मीरा भाईंदर), अजित जाधव (पुणे ग्रामीण ते टीआरटीआय अमरावती), प्रमोद क्षीरसागर (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग), विश्वजित जगताप (पुणे शहर ते रागुवी), निलेश बदाख (पुणे ग्रामीण ते ठाणे शहर), संतोष जाधव (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), धनंजय कापरे (पुणे ग्रामीण ते ठाणे शहर), अतुल भोस ( पुणे ग्रामीण ते गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), नंदकुमार केंचे (पुणे शहर ते रागुवी), संजय चव्हाण (पुणे शहर ते मुंबई शहर), प्रीती शिंत्रेलंबे (पुणे ते म.सु.प), सुदर्शन गायकवाड (पुणे शहर ते मुंबई शहर), पंडित रेजितवाड (पुणे शहर ते लाप्रवी), राजेंद्र दहिफळे (पुणे शहर ते मुंबई शहर), माधवी राजे/कुंभार (गुन्हे अन्वेषण विभाग ते मुंबई शहर), दत्तात्रय गुंड (पुणे ग्रामीण ते मुंबई शहर), किरण लोंढे (पुणे शहर ते मुंबई शहर), अर्चना बोदडे (पुणे शहर ते मुंबई), निलेश वाघमारे (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)