आता काऊंटिंगसह सॅनिटाइज्ड होणार नोटा, अब्दुल कलाम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बनवली खास मशीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आज सर्वकाही सॅनिटाइज केले जात आहे. कोरोना काळात एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, त्यांनी असे एक मशीन तयार केले आहे जे केवळ नोटा मोजतच नाही तर त्यांना स्वच्छही करते. हे मशीन बनवणाऱ्या विद्यार्थी अनुज शर्मा आणि त्याच्या टीमचा दावा आहे की, नोट स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या या मशीनला केवळ १४ ते १५ हजार रुपये खर्च येतो.

या मशीनच्या फोटोमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की, मशीनमध्ये एक खास सॅनिटायझर लावले आहे. जे आरामात स्वच्छतेचा विचार करून पैसे मोजू शकते. सर्वात चांगली गोष्ट अशी की कोरोना महामारी दरम्यान लोकांच्या सुरक्षेचा विचार करून ही मशीन बनवली गेली आहे. मशीन बनवणाऱ्या अनुज शर्मा या विद्यार्थ्याने सांगितले की, या मशीनमध्ये एका मिनिटात २०० नोटा मोजण्याची क्षमता आहे.

सोशल मीडियावर या विशिष्ट मशीनचा फोटो आल्यापासून ती लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. लोक या नोट सॅनिटायझिंग मशीनचे खूप कौतुक करत आहेत. सोशल मीडिया युजर्स एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीचे अनुज शर्मा आणि टीमचे अभिनंदन करतानाही दिसत आहेत. एका वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटवर आतापर्यंत ४०० हून अधिक लाईक्स आणि ५० रिट्वीट आले आहेत. एवढेच नाही तर लोक या पोस्टच्या खाली कमेंट देखील करत आहेत.

https://twitter.com/IamThakurSonam/status/1283909009079033856

एका युजरने कमेंट करत लिहिले, मस्त. तर एका युजरने कमेंट केली… हे एक चांगले काम आहे.

ट्विटर यूजर सूरज दुबेने हे मशीन पाहिल्यानंतर म्हटले की, गरज ही नाविन्याची जननी आहे आणि या मुलांनी हे सिद्ध केले आहे.