Apla Pune Cyclothon | ‘आपलं पुणे सायक्लोथॉन’ स्पर्धेचे दुसरे पर्व भरघोस प्रतिसादात संपन्न; महाराष्ट्रातील विविध शहरांतून ५००० पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग

पुणे : Apla Pune Cyclothon | पुनीत बालन ग्रुप (Punit Balan Group) प्रायोजित व IPS अधिकारी कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली तसेच फिनोलेक्स पाईप्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आपलं पुणे सायक्लोथॉन” स्पर्धेचे दुसरे पर्व ५ मार्च २०२३ रोजी भरघोस प्रतिसादात संपन्न झाले. या स्पर्धेत पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, बारामती, मालेगाव, सातारा, कोल्हापूर, धुळे यांसह अनेक ठिकाणाहून ५००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला.

स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभाला पुनीत बालन (Punit Balan), कृष्ण प्रकाश, विकास ढाकणे (अतिरिक्त आयुक्त, पुणे म.न.पा.), संदीप सिंग गिल (उपायुक्त, झोन १, पुणे पोलीस), प्रदीप वेदुला (फिनोलेक्स पाईप्स), सचिन कुलकर्णी (फोक्सवॅगन आणि स्कोडा), विनोद गायकवाड (डेकॅथलॉन), भूषण वाणी (क्रिसेंट म्युच्युअल फंड), संदीप गुप्ता आणि शर्वरी दीक्षित (बॉडी फर्स्ट), अनुराग त्यागी व सुधीर मडगुणकी (AU स्मॉल फायनान्स बँक), रवी भोसले व अशोक शिंदे (रोटरी पिंपरी इलाईट), अविनाश वाणी (बुक स्टेशन), पायल राठी (केअर फॉर यु), राजेश बाहेती (कोकोआ मेल्ट्स), कोर टिम मेंबर्स संजना लाल, जयेश संघवी, यश रायकर, सुषमा कोप्पीकर, मेहेर तिवारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभली. (Apla Pune Cyclothon)

याप्रसंगी बोलताना स्पर्धेचे मुख्य प्रायोजक पुनीत बालन म्हणाले “सायकल चालविणे हा एक परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे आणि त्याला वयाचे बंधन नाही, नियमित सायकल चालविल्यास शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबरच वायू प्रदूषणाला सुद्धा आळा बसतो” तसेच पुनीत बालन यांनी जोशपूर्ण घोषणा देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला. “पुण्याला पुन्हा एकदा सायकलींचे शहर अशी ओळख निर्माण करण्यासाठी मागच्या वर्षापासून “आपलं पुणे सायक्लोथॉन” आयोजित करण्यात येत आहे, यंदा त्याचे दुसरे पर्व असून यापुढे दरवर्षी ही स्पर्धा अधिक मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येणार आहे.

“पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन” ही जशी पुण्याची ओळख आहे तशीच “आपलं पुणे सायक्लोथॉन” सुद्धा पुण्याची एक ओळख व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत” असे मनोगत IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. पुणेकरांनी जर असेच हजारोंच्या संख्येने सायकलचा वापर सुरु केला तर त्याप्रमाणे आपोआपच सुविधा पण निर्माण होतील. जसे की सायकलसाठी स्वतंत्र लेन, जागोजागी सायकल स्टॅन्ड इ. असे स्पर्धेचे ऑर्गनायझर रविंद्र वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. (Apla Pune Cyclothon)

“आपलं पुणे सायक्लोथॉन” स्पर्धेचे दुसरे पर्व रविवार, ५ मार्च २०२३ रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल,
म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते व १०, २५, ५० व १०० किलोमीटर अशा ४ अंतरांमध्ये
या स्पर्धेची विभागणी केली होती. सर्वांसाठी खुली असणाऱ्या १० किलोमीटर स्पर्धेचे नाव जॉय राईड होते,
तर स्त्रियांच्या २५ किलोमीटर स्पर्धेचे नाव पिंक पेडलिंग असे होते, तसेच ५० किलोमीटरची प्राईड राईड व १००
किलोमीटरची एन्ड्युअर राईड आणि फक्त पुरुषांसाठी असलेली २५ किलोमीटर अशा वेगवेगळ्या स्पर्धा
आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक सहभागी स्पर्धकास सायकलिंग जर्सी, स्लिंग बॅग व स्पर्धेदरम्यान
हायड्रेशन सपोर्ट देण्यात आला तसेच यशस्वीपणे अंतर पार करणाऱ्या स्पर्धकांना फिनिशर्स मेडल्स देण्यात आली.
१० किलोमीटर अंतरांव्यतिरिक्त इतर सर्व स्पर्धकांना कस्टमाइज्ड BIB आणि टाईमिंग चिप देण्यात आल्या
आणि विविध गटातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.
या स्पर्धेला सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रची मान्यता लाभली आहे.

स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे

१०० किलोमीटर – मनुप्रिय पुराणिक (महिला गट), विश्वनाथ यादव (पुरुष गट)
५० किलोमीटर – गौरी गुमास्ते (महिला गट), धीरज सावंत (पुरुष गट)
२५ किलोमीटर – ऐश्वर्या दुधाळे (महिला गट), कृष्णा तिडके (पुरुष गट)

स्पर्धेबरोबरच विविध सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी “चॅरिटी राइड्स” सुद्धा घेण्यात आल्या व त्यातून मदतनिधी उभारण्यात आला. फिनोलेक्स पाईप्स यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या “आपलं पुणे सायक्लोथॉन” स्पर्धेचे मुख्य प्रायोजक पुनीत बालन ग्रुप असून भारतातील आघाडीची राष्ट्रीय स्तरावर मॅरेथॉन, ट्रायथलॉन्स व सायक्लोथॉन्स आयोजित करणारी क्रीडा संयोजक संस्था चॅम्प एन्ड्युरन्स या स्पर्धेचे संयोजक आहेत.
तसेच एनसीबी, पुणे पोलीस, पुणे मनपा, पिंपरी चिंचवड पोलीस, पिंपरी चिंचवड मनपा, पुणे मेट्रो,
पुणे महानगर परिवहन मंडळ यांच्यासह विविध संस्थांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

Web Title : Apla Pune Cyclothon | The second edition of Apla Pune Cyclothon concluded with great response; More than 5000 contestants participated from various cities of Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘काही लोक 365 दिवस शिमगा करतात, मला त्यांना एवढंच सांगायचंय…’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

Maharashtra Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Pune Pimpri Chinchwad Crime | प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून, दिघीतील घटना; दोन सख्ख्या भावांना अटक