भारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली महत्वाची माहिती, लवकरच क्रिकेटप्रेमींना मिळेल ‘ही’ Good News !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात मार्च 2020 च्यानंतर आतापर्यंत एकही क्रिकेट मॅच खेळवण्यात आलेली नाही. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने या गोष्टीचे आश्वासन दिले आहे की, लवकरच देशात क्रिकेट सीरीज आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल. बीसीसीआय अध्यक्षांनी म्हटले की, इंग्लंड आणि भारताची सीरीज आयोजित करण्याबाबत बोर्ड काम करत आहे, स्थिती सामान्य झाल्यानंतर टीम दौर्‍यावर येऊ शकते.

भारत आणि इंग्लंडमध्ये तीन फॉर्मेटची सीरीज खेळली जाणार आहे. जानेवारीमध्ये इंग्लंडच्या टीमला भारताच्या दौर्‍यावर यायचे आहे, ज्यामध्ये पाच टेस्ट, तीन वनडे आणि तेवढ्याच टी20 मॅचेसच्या सीरीज खेळवल्या जाणार आहेत. 2021 मध्ये जानेवारी ते मार्चमध्ये हा दौरा होऊ शकतो.

याबाबत बीसीसीआय अध्यक्षांनी म्हटले की, आमचे प्राधान्य आहे की, ही सीरीज (भारत आणि इंग्लंड) भारतात आयोजित करण्यात यावी. आम्ही त्या भारतीय मैदानावरच खेळवण्याचा प्रयत्न करू. यूएईमध्ये करण्याचा फायदा हा होईल की, येथे तीन (दुबई, अबूधाबी आणि शारजाह) स्टेडियम आहेत.

आपल्याकडे मुंबईतही अशीच सुविधा उपलब्ध आहे, तेथे सीसीआय, वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियम आहे. आपल्याकडे कोलकाताचे ईडेन गार्डन्स मैदान सुद्धा आहे. आम्हाला आपल्या क्रिकेट मॅच भारतात खेळवायच्या आहेत, कारण खेळ तर तेथेच असतो जेथे तुमचे हृदय असते.

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आयपीएलमधील सध्याच्या फॉर्मवर सौरवने म्हटले- सध्याच्या स्थितीत त्याला जुन्या फॉर्ममध्ये येण्यासाठी थोडा उशीर लागेल. तो सुमारे दिड वर्षानंतर क्रिकेट खेळत आहे. हे सोपे नसते. जेव्हा धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये होता, तेव्हासुद्धा मी म्हटले होते की, त्याने चौथ्या नंबरवर फलंदाजी केली पाहिजे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like