ऑलराऊंडरचा खुलासा ! MS Dhoni च्या मनात अनेक नावे, कोण होणार CSK चा पुढील कॅप्टन

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायजी टीम चेन्नई सुपर किंग्सचा समावेश सर्वात यशस्वी टीममध्ये आहे. टीमने महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टनशीपमध्ये आतापर्यंत तीनवेळा ही टूर्नामेंट जिंकली आहे. धानीने मागच्या महिन्यातच इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता आयपीएलमध्ये त्याच्या टीमचा कॅप्टन कोण असेल यावर चर्चा सुरू आहे.

एमएस धोनीच्या नंतर सर्वात अनुभवी नाव सुरेश रैनाचे येते. तो टीमसोबत पहिल्या सीझनपासून आहे आणि धोनीच्या नंतर कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. या सीझनमध्ये त्याने वैयक्तिक कारणामुळे टूर्नामेंटमधून नाव मागे घेतले. परंतु, टीमसोबतचे त्याचे नाते बिघडलेले नाही. चेन्नई सुपर किंग्सच्या मालकांनी म्हटले आहे की, ते रैनाला आपल्या मुलाप्रमाणे मानतात.

एका न्यूज चॅनलशी बोलताना ऑलराऊंडर ड्वेन ब्राबोने सांगितले की, महेंद्र सिंह धोनीच्या ठिकाणी चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन कोण होऊ शकतो. ब्रावोचे म्हणणे आहे की, प्रत्येकाला आपला खेळ कधी ना कधी तर सोडावाच लागणार आहे. हे तर काळ ठरवतो, की केव्हा आपली जागा सोडायची आणि कुणाकडे आपली जबाबदारी सोपवायची. मग तो रैना असो की, की अन्य कुणी तरूण खेळाडू.

रैनाच्या या सीझनमध्ये न खेळण्याबाबत शंका कायम आहे. युएईवरून तो भारतात परतला आहे, परंतु परतीचे संकेत सुद्धा त्याने दिले आहेत. त्याने म्हटले होते की, कुणाला काय माहित की मी पुन्हा टीममध्ये परतू शकतो. यावेळची आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये खेळली जाणार आहे.