IPL मुळं कोणाचा जीव जायला नको, किंग्स 11 पंजाबच्या मालकानं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आज इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनाबद्दल बैठक घेताना दिसत आहे. यात टूर्नामेंटमध्ये भाग घेणाऱ्या सर्व फ्रेंचायजीच्या टीमच्या मालकांना बोलावण्यात आलं आहे.

या बैठकीआधी किंग्स इलेव्हन पंजाबच्या को-ओनरनं व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “चाहत्यांची आणि खेळाडूंची सुरक्षा सर्वात आधी महत्त्वाची आहे.” स्पोर्ट स्टारशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “तुम्ही चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या सुरक्षेसोबत तडजोड करू शकत नाहीत. बीसीसीआयनं टूर्नामेंट स्थगित एक चांगला निर्णय घेतला आहे. आयपीएलमुळं कोणाचा जीव जायला नको.”

पढे बोलताना ते म्हणाले, “सरकारनं पब्लिक गॅदरींगवर रोख लावून चांगला निर्णय घेतला आहे. मीटींग मध्ये असं सुचवू इच्छितो की, या स्थितीवर दोन आठवडे बारीक नजर ठेवली जाईल. तुम्ही लोकांच्या जीवासोबत तडजोड करू शकत नाहीत. जर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्थिती सुधारली नाही तर कठिण निर्णय घ्यावा लागेल. नंतर पस्तावा करण्यापेक्षा सुरक्षित राहून काळजी घेतलेली कधीही चांगली. आपण काळजी घ्यायला हवी. योग्य ते उपाय करण गरजेचं आहे.”

शुक्रवारी बीसीसीआयनं आयपीएलच्या आयोजनाला 15 एप्रिलपर्यंत स्तगिती देण्याचा निर्णय घेतला होता. बोर्डानं हे स्पष्ट केलं की, कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशात टूर्नामेंट न घेणंच चांगलं.