जेव्हा स्मोकिंगमुळं ‘किंग’ खाननं मागितली होती माफी ! खुद्द अभिनेत्यानंच केला ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड कलाकार लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतात. बॉलिवूड स्टार शाहरुख खान अशाच कलाकारांपैकी एक आहे. प्रत्येक कलाकारांमध्ये काही चांगले गुण असतात आणि काही वाईट गुणही असतात. शाहरुख खानच्या बाबतीतही त्याची एक वाईट सवय होती.

शाहरुख खान एक चेन स्मोकर आहे. त्याला स्मोकिंगची सवय आहे. अनेक दिवसांपासून तो या सवयीपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एका मुलाखतीत बोलताना शाहरुखनं सांगितलं आहे की, त्यानं स्मोकिंगच्या सवयीमुळं एका फॅनची माफी मागितली होती. 2006 साली जेव्हा शाहरुख डॉन सिनेमाचं प्रमोशन करत होता. तेव्हा एका चॅट शोमध्ये एका चाहत्यांना शाहरुखला प्रश्न विचारला होता.

एका चाहत्यानं शाहरुखला विचारलं की, तू अँटी कॅन्सर प्रॉडक्ट लाँच करतो तर ही गोष्ट विचित्र नाहीये का तू स्वत: चेन स्मोकर आहेस. यावर शाहरुखनं इमानदारीनं उत्तर दिलं. शाहरुख म्हणाला, “हे विचित्र आहेच. परंतु मी लोकांना पोलिओचे इंजक्शन घेण्याचा सल्ला देतो पण मी स्वत: तर घेत नाही ना. मी प्रत्येक वेळी सांगितलं आहे की, मी स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि लवकरच सोडणार आहे. अशात जर एखादं चांगलं प्रॉडक्ट लाँच करण्याची संधी मिळत असेल तर मी पुढे येतो. माझ्या नजरेत चांगल्या गोष्टी लोकांपर्यंय गेल्या  पाहिजेत.”

हा प्रश्न तर पुढे साऱ्यांच्याच मनात राहिला की, शाहरुख कॅन्सरिविरोधात लढा छेडतो परंतु स्वत: मात्र स्मोकिंग करतो. यावर एका मुलाखतीत शाहरुख म्हणाला की, “ज्या दिवशी मला कंपनीनं प्रॉडक्ट लाँचिंगसाठी फोन केला होता त्या दिवशी माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. त्यांचाही मृत्यू कॅन्सरनंच झाला होता. अशात मी विचार केला की, या प्रॉडक्टला लाँच करून मी त्यांची पूजा करेन. परंतु मी माझ्या स्मोकिंगसाठी माफी मागतो. प्रयत्न करत आहे. लवकरच सोडून देईन.”