आप्पासाहेब जगदाळेंना कुस्तीक्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार जाहीर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर कृृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जीजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पै. अप्पासाहेब जगदाळे यांना निमगाव केतकी येथिल सुवर्णयुग गणेश मंदीर ट्रस्ट व अष्टविनायक ग्रुपच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा कुस्ती क्षेत्रातील मानाचा जीवन गौरव पुरस्कार २०१९, हा जाहीर झाला आहे. गुरूवार दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी निमगाव केतकी येथिल गणेश यात्रेनिमित्त भरणार्‍या ऐतिहासीक चिंचेच्या कुस्तीमैदानात आप्पासाहेब जगदाळे यांना जीवन गौरव पुरस्कार, मानपत्र व रोख रक्कम २१ हजार रूपये देवुन गौरविण्यात येणार असल्याची माहीती सुवर्णयुग गणेश मंदीर ट्रस्ट व अष्टविनायक ग्रुपच्या वतीने देण्यात आली.

महाराष्ट्राचा मर्दानी खेळ असलेल्या लाल मातीतील कुस्ती टीकावी व वाढावी यासाठी कुस्ती क्षेत्रात विशेष योगदान देणार्‍या व्यक्तीस दरवर्षी जीवन गौरव पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येत असते. यंदाचे हे पाचवे वर्ष असुन याअगोदर मल्लसम्राट पै. रावसाहेब मगर, कुस्ती निवेदक पै. प्रशांत भागवत, उद्योजक उत्तमराव फडतरे, एन एस आय कोच मारूती मारकड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आप्पासाहेब जगदाळे यांचे मातीतील कुस्ती क्षेत्रात मोठे व महत्वाचे योगदान आहे. त्यामुळेच यंदाच्या वर्षी २०१९ च्या पुरस्कारासाठी संस्थेच्या विश्वस्त मंडळाने आप्पासाहेब जगदाळे यांची निवड केली आहे.

आप्पासाहेब यांचे वडील कै.नानासाहेब व काका मोतीराम जगदाळे यांच्या कडुन कुस्तीमल्ल विद्देची प्रेरणा घेतलेल्या आप्पासाहेबांनी मल्ल सम्राट रावसाहेब मगर व रूस्तम – ए -हिंद केसरी हरिश्चंद्र बीराजदार यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. १९८९ मध्ये ८२ किलो वजन गटात ते महाराष्ट्र चॅपीयन बनले. तर १९९९ साली त्यांनी स्वत:च्या सराटी गावामध्ये लाला मातीची तालीम सुरू केली. २००४ मध्ये अकलुज येथे सर्वसुविधायुक्त अत्याधुनिक व अद्यायवत असे त्रीमुर्ती तालीम कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले. यातील आनेक मल्ल राज्य पातळी व राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत.

दर वर्षी ४ सप्टेंबर रोजी मौजे सराटी ता. इंदापूर येथे मोठे कुस्ती मैदान आयोजित करण्यात येत असते. पूणे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे १८ वर्षे संचालक, नीरा भीमा कारखाण्याचे उपाध्यक्ष, इंदापूर तालुका दुध गंगाचे अध्यक्ष अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी विविध संस्थामध्ये सांभाळलेल्या आहेत. तर ३५० गरीब कुटुंबातील मुलींना कन्यादान योजनेतुन लग्णकार्यासाठी आर्थीक मदत केली असुन ते अध्यक्ष असलेल्या जीजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी येथिल संस्थेत ७ हजार ५००च्या वर विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत असल्याने आप्पासाहेब जगदाळे यांचे कुस्ती क्षेत्रातील आजवरचे योगदान व सामाजिक क्षेत्रात ते करत असलेले काम यामुळे आप्पासाहेब जगदाळे यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार २०१९ हा जाहीर झाल्याची संस्थेंच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/