इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का ! ‘या’ 3 दिग्गजांचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकुन भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तर त्यांचेसोबत छत्रपतीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, जेष्ठ नेते अशोक घोगरे यांनीही भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठींबा जाहीर दिल्याने इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तर आमदार दत्तात्रय भरणे यांचेसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

जगदाळे यांनी इंदापूर विधानसभेसाठी अपक्ष फाॅर्म दाखल केला होता. इंदापूर तालुक्यातील सर्वसामाण्यांचे रखडलेले १४ प्रश्न जो पक्ष मार्गी लावेल त्याच पक्षाला आपण पाठींबा जाहीर करणार असल्याचे जगदाळे यांनी जाहीर केले होते. याबाबत राष्ट्रवादी व भाजपा या दोन्हीही नेत्यांना मागण्याबाबत कळविले होते. परंतु राष्ट्रवादीकडून उत्तर मिळाले नाही. माजी मंत्री व भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी सदरचे प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांचेशी चर्चा करून सदर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. म्हणूनच आपन हर्षवर्धन पाटील यांना पाठींबा जाहीर करत असल्याचे अप्पासाहेब जगदाळे यांनी सांगीतले.

इंदापूर येथिल जुणी कृृषि उत्पन्न बाजार समीती आवारात अप्पासाहेब जगदाळे यांचे वतीने पाठींबा देणेबाबतचा निर्णय जाहीर करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेचा निर्णय तो आपला निर्णय म्हणत तालुक्यातील सर्वसामाण्य जनता व शेतकर्‍यांशी निगडीत अनेक प्रश्न मार्गी लावण्यात दोन्ही पक्ष अपयशी ठरल्याने जगदाळे यांनी इंदापूर विधानसभेसाठी बंडाचे निशान हाती घेतले होते. त्यावेळी अप्पासाहेब जगदाळे, बाळासाहेब घोलप, अशोक घोगरे यांनी भाजपला पाठींबा देण्याचे जाहीर केले. व आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याचे जाहीर केले. व जास्तीत जास्त मताने हर्षवर्धन पाटील यांना निवडून आणणार असल्याचे सांगीतले.

तर आजचा क्षण हा ऐतिहासिक क्षण आसुन अप्पासाहेब जगदाळे यांनी सांगीतलेले १४ मुद्दे इंदापूर तालुक्याच्या दृृष्टीने महत्वाचे असुन ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांचेशी या प्रश्नांवर चर्चा झाली आहे. या सर्व मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली असुन तसा नारोप त्यांनी माझ्याकडे दीला आहे असा शब्द हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सभेत बोलताना दील्याने सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवुन स्वागत केले. व अप्पासाहेब जगदाळे, बाळासाहेब घोलप, अशोक घोगरे यांनी भाजपाला पाठींबा दील्याबद्दल या सर्वांचे जाहीर आभार मानले.

यावेळी अप्पासाहेब जगदाळे, अशोकराव घोगरे, बाळासाहेब घोलप, पदमाताई भोसले, कृृष्णाजी यादव, पांडूरंगतात्या शिंदे, वसंतराव मोहळकर, युवराज मस्के, नानासाहेब शेंडे, पृथ्विराज जाचक, देवराज जाधव, दिपक जाधव, पिंटु काळे, प्रदीपमामा जगदाळे, संजय निंबाळकर इ. प्रमुख उपस्थित होते.

Visit : Policenama.com