महाराष्ट्र बसव परिषदेच्या अनेराये यांच्याकडून काळजी घेण्याचं आवाहन

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  कोविड-19 या व्हायरसने सर्व जगात थैमान घातले असताना संपूर्ण देशात त्याच बरोबर महाराष्ट्रात देखील खूप मोठ्या संख्येने कोरोनाची रुग्ण आढळत आहेत. आपल्या नांदेड जिल्ह्यात देखील रुग्णांची संख्या वाढली आहे, नायगाव शहरांमध्ये देखील रुग्ण आढळले आहेत आणि अनेक जनाचे साॅब तपासणीला दिलेले आहेत. कोरोनाची लागण झालेले रुग्ण आजारातून बरे होताना देखील दिसत आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे व स्वतःबरोबर कुटुंबाची काळजी घ्यावी. असे आवाहन महाराष्ट्र बसव परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश वि. अनेराये यांनी केले आहे.

सोशल डिस्टेन्सिंग ठेवा तसेच नायगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे त्याच बरोबर बाजारपेठही मोठी असल्याने जवळपास चार ते पाच तालुक्यातून नागरीक इथे ये जा करत असतात  त्यामुळे लोकांना विनंती आहे की आपलं अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर यावं. तोंडाला मास्क वापरावा, सॅनिटायझेरने हाथ स्वच्छतेसाठी वेळोवेळी वापर करावा, सामाजिक अंतर ठेवावे, शासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावेत ही नायगाव व परिसरातील लोकांना विनंती आहे. कृपया घाबरून जाऊ नका..काळजी घ्या..सतर्क राहा..घरी राहा सुरक्षित रहा !