वजन कमी करण्यासाठी सफरचंदच्या ‘व्हिनेगर’पासून तयार करा ‘ही’ 2 स्पेशल ड्रिंक, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर अनेक प्रकारच्या खाण्याच्या पदार्थात वापरले जाते. वजन कमी करण्यासाठी हे व्हिनेगर उपयुक्त असल्याचे अनेक संशोधनात आढळून आले आहे. वजन कमी करण्यासह याचे इतरही अनेक फायदे आहेत. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर फर्मेंटेड सफरचंदपासून तयार होते. यासाठी कापलेले सफरचंद पाण्यात टाकून खोलीच्या तापमानात ठेवले जाते. असे तोपर्यंत करतात, जोपर्यंत संफरचंदमधील नैसर्गिक शर्करा फर्मेंट होत नाही. हे व्हिनेगर पिण्याच्या अनेक पद्धती आहेत. यातील लाभदायक पद्धती आपण जाणून घेणार आहोत.

असे करा अ‍ॅप्पल व्हिनेगरचे सेवन
अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर नेहमी इतर पदार्थांसोबत सेवन करा, अन्यथा दातांचे नुकसान होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करा.

1 पाण्यासोबत
वजन कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात हे व्हिनेगर टाका आणि प्या. यासाठी एक किंवा दोन मोठे चमचे व्हिनेगर घ्या. यामुळे फॅट बर्न होते. आंबट लागत असेल तर थोडे मध मिसळू शकता.

2 लिंबू, मधासोबत
सुमारे 20 एमएल अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिसळा. यामध्ये इच्छेनुसार लिंबू रस टाका. हे ड्रिंक गोड करण्यासाठी एक चमचा मध मिसळा. हे ड्रिंक आरोग्यवर्धक, स्फूर्तिदायक आहे. हे प्यायल्याने भूक कमी लागते, पोट भरल्यासारखे वाटते, संपूर्ण दिवस कमी कॅलरी घेतल्या जातील. तसेच वजन कमी होण्यास मदत होईल.