‘Apple’ कडून 7 कोटी रूपये कमवण्याची ‘सुवर्ण’संधी, शोधायला लागणार ‘iPhone’ मधील सुरक्षिततेची ‘त्रुटी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील सर्वात जास्त खप असलेली आणि सर्वात लोकप्रिय मोबाईल कंपनी ऍपल तुम्हाला ७ कोटी रुपये कमावण्याची संधी देणार आहे. जर तुम्ही मोबाईलच्या सुरक्षेतील त्रुटी सापडून दिल्यास कंपनी तुम्हाला हे बक्षीस देणार आहे.

त्यामुळे लवकरच तुम्हाला करोडपती होण्याची संधी आहे.सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सला हि मोठी संधी असून कंपनीच्या वतीने देण्यात येणारे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे बक्षीस आहे. ऍपल कंपनी आपल्या प्रॉडक्ट्मध्ये त्रुटी सापडून देणाऱ्यास हे बक्षीस देणार आहे. याआधी कंपनीने फक्त सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सला हि संधी दिली होती मात्र आता कुणीही सामान्य नागरिक देखील हि त्रुटी दाखवून बक्षीस मिळवू शकतो.

मागील काही दिवसांपासून अशी माहिती समोर येत होती कि, अमेरिकी सरकार मागील काही दिवसांपासून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर आणि त्यांच्या कॉल रेकॉर्डवर लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर येत होती.

ब्लॅक हॅट सेक्युरिटी कॉन्फरन्समध्ये केली घोषणा
गुरुवारी अमेरिकेच्या लास वेगासमध्ये मध्ये झालेल्या ब्लॅक हॅट सेक्युरिटी कॉन्फरन्समध्ये कंपनीने हि घोषणा केली. यासाठी कंपनीने रिसर्चर्ससाठी Mac software नावाच्या तंत्रज्ञानाची तयारी सुरु केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त