Apple iPhone 12 in India : ‘iPhone 12’ सिरीजचे चारही स्मार्टफोन ‘लाँच’, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅपल पार्क येथे सुरू झालेल्या अ‍ॅपल इव्हेंट (Apple Event) दरम्यान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक (Tim Cook) यांनी मागील इव्हेंटची आठवण केली. त्यानंतर त्यांनी होम पॉड मिनी स्मार्ट स्पीकर (Home Pod Mini Smart Speaker) लाँच केला. होम पॉड मिनी स्मार्ट स्पीकरची बॉडी फॅब्रिकची आहे. त्याची सुरक्षितता खूपच मजबूत असल्याचा दावा केला जात आहे. त्याच वेळी, स्पीकरजवळ आयफोन (iPhone) नेताच कनेक्ट होईल. यात अ‍ॅपल सिरी चा देखील सपोर्ट मिळेल. हा स्पीकर आपल्या आयफोनला देखील सर्च करेल. याची किंमत 99 डॉलर्स आहे. त्याची विक्री 5 नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्याच वेळी, व्हाईट अँड स्पेस ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या होम पॉड मिनीची किंमत भारतात 9,900 रुपये ठेवण्यात आली आहे. यानंतर कुकने iPhone 12 ला सादर केले आहे. त्यांनी आयफोन 12 ला आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असल्याचे म्हटले आहे.

आयफोन 12 वर ग्राहकांना मिळतील 6 कलर ऑप्शन
आयफोन 12 सोबत 5जी सपोर्ट मिळेल. आयफोनच्या 5जी चा स्पीड 4GB/PS असेल. अ‍ॅपलने iPhone 12 ला सहा कलरच्या ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. डिस्प्लेसह एचडीआर 10 चा सपोर्ट देण्यात आला आहे. या ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगचा पर्याय देखील देण्यात आला आहे. आयफोन 12 मधील दुसरे सिम हे ई-सिम असेल. अ‍ॅपलच्या या स्मार्टफोनसोबत ए-14 बायोनिक प्रोसेसर मिळणार आहे. कॅमेर्‍यासह अल्ट्रावाइड मोड, नाईट मोडचे फीचर्स देण्यात आले आहेत. त्याच वेळी आयफोन 12 च्या सर्व व्हेरिएंट्समध्ये नाईट मोड देण्यात येत आहे. नाईट मोडमध्ये टाइम लॅप्स देखील मिळतील. यासह 50 वॅटपर्यंत वायरलेस फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. उत्तम वायरलेस चार्जिंगसाठी आयफोन 12 मध्ये मॅगसेफ टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. आयफोन 12 आणि अ‍ॅपल वॉच एकाच चार्जरने चार्ज केले जाऊ शकतात.

iPhone 12 Mini मध्ये 5.4 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे
अ‍ॅपलने iPhone 12 Mini देखील लाँच केला आहे. याची स्क्रीन 5.4 इंच आहे. आयफोन 12 चे सर्व फीचर्स त्यात असतील. त्याला जगातील सर्वात छोटा 5G स्मार्टफोन म्हटले जात आहे. आयफोन-12 ची किंमत 799 डॉलर असेल आणि आयफोन 12 मिनी ची किंमत 699 डॉलर असेल. अ‍ॅपलच्या iPhone 12 pro मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. त्याचवेळी स्टेनलेस स्टील आणि ग्लास बॉडीसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जात आहे. सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, 12 मेगापिक्सलचा अल्ट्राव्हायोलेट एंगल कॅमेरा, 12 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स यासारख्या फीचर्समुळे यास आयपी 68 रेटिंग प्राप्त झाले आहे. हा फोन सहा मीटर खोल पाण्यात 30 मिनिटांपर्यंत राहू शकतो.

iPhone 12 Pro Max मध्ये आहे 128 ते 512GB ची मेमरी
टिम कुकने iPhone 12 Pro Max देखील लाँच केला आहे. त्याची प्रारंभिक किंमत 1099 डॉलर ठेवली गेली आहे. हे 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज मेमरीच्या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. यात 6.7 इंचाचा वाइड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. अ‍ॅपलच्या या स्मार्टफोनसह ए-14 बायोनिक प्रोसेसर देखील मिळेल. याशिवाय आयफोन 12 चे इतर सर्व फीचर्स देखील यात असतील. त्याचबरोबर टिम कुकने आयफोन 12 सीरीजचे चारही स्मार्टफोन होम पॉड मिनी स्मार्ट स्पीकर लाँच केले आहेत.

भारतात आयफोन 12 सीरीजची ही असेल किंमत
भारतात आयफोन 12 मिनी (iPhone 12 Mini) ची किंमत 69,900 रुपये ठेवली गेली आहे. त्याचवेळी, iPhone 12 भारतात 79,900 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. हे दोन्ही अ‍ॅपलचे स्मार्टफोन 30 ऑक्टोबरपासून भारतीय बाजारात उपलब्ध होऊ लागतील. याशिवाय आयफोन 12 प्रो (iPhone 12 Pro) भारतीय बाजारात 1,19,900 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. त्याच वेळी, iPhone 12 Pro Max च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 1,29,900 रुपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन देखील 30 ऑक्टोबरपासून भारतात उपलब्ध होतील.