अ‍ॅप्पलकडून चीनला मोठा झटका ! गेमिंग इंडस्ट्रीवर मोठी कारवाई, iOS स्टोरवरून हटवले 30 हजार Apps

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅप्पलने शनिवारी चायनीज अ‍ॅप स्टोरवरून सुमारे 29,800 पेक्षा जास्त अ‍ॅप्स हटवले, ज्यापैकी 26 हजारपेक्षा अ‍ॅप्स गेमिंगचे आहेत. चीनची एक रिसर्च फर्म टळारळ ने आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. अ‍ॅप्पलने ही कारवाई चीनी अथॉरिटीद्वारे लायसन्स न घेतल्याने केली आहे. मात्र, या प्रकरणावर आतापर्यंत अ‍ॅप्पलकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये अ‍ॅप्पलने पब्लिशर्सना जूनपर्यंतची डेडलाईन दिली होती की त्यांनी स्थानिक सरकारकडून जारी लायसन्स नंबर बाबत माहिती द्यावी, जेणेकरून यूजर्सला मेक इन-अ‍ॅप खरेदीची सुविधा मिळेल. चीनचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप स्टोर खुप अगोदरपासूनच या रेग्युलेशनचे पालन करत आहे. मात्र, आतापर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की, अखेर या वर्षीच अ‍ॅप्पल या नियमासाठी सक्त धोरण का अवलंबले.

मागच्या महिन्यातही हटवले होते अडीच हजार अ‍ॅप
जुलैच्या पहिल्या आठवड्यात या स्माटफोन निर्माता कंपनीने 2,500 पेक्षा जास्त टायटल्सना आपल्या अ‍ॅप स्टोरवरून हटवले होते. या अ‍ॅप्सची लीस्टमध्ये नूपसर आणि सुपरसेल सारख्या डेव्हलपर्सच्या गेमिंग अ‍ॅप्सचा सुद्धा समावेश होता. या दरम्यान रिसर्च फर्म सेंसर टॉवरने आपल्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली होती.

गेमिंग इंडस्ट्रीबाबत चीनी सरकार सक्त
चीनचे सरकार मोठ्या कालावधीपासून आपल्या येथील गेमिंग इंडस्ट्रीजवर कडक नियम लागू करण्यावर जोर देत आहे. जेणेकरून सेन्सिटीव्ह माहिती व कंटेन्टला लगाम लावता येईल. जे गेमिंग अ‍ॅप्स इन-अ‍ॅपच्या खरेदीची सुविधा देतात, त्यांची अप्रुव्हल प्रोसेस खुप गुंतागुंतीची आहे. याच कारणामुळे, चीनच्या गेमिंग अ‍ॅप डेव्हलपर्ससाठी समस्या निर्माण झाली आहे. चीनमध्ये जगातील सर्वात मोठी गेम डेव्हलपर्सची इंडस्ट्री आहे.

छोटया आणि मध्यम स्तराच्या डेव्हलपर्ससाठी समस्या
अ‍ॅप्पल, चायनाच्या मार्केटिंग मॅनेजरच्या हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या कारवाईमुळे छोट्या आणि मध्यम डेव्हलपर्सवर जास्त परिणाम होईल. त्यांची कमाई कमी होईल. परंतु, आता बिझनेस लायसन्स प्राप्त करण्याच्या गुंतागुंतीमुळे चीनमध्ये आयएसओ गेम इंडस्ट्रीला सुद्धा नुकसान होत आहे.

अ‍ॅप्पलने दिली होती 30 जूनपर्यंत डेडलाइन
टळारळ च्या रिपोर्टनुसार, फेब्रुवारी 2020 मध्ये अ‍ॅप्पलने आपल्या अ‍ॅप स्टोरच्या बॅक स्टेज रिव्ह्यू पेजवर एक मेसेज अपडेट केला होता. या मॅसेजमध्ये सांगितले होते की, चीनच्या कायद्यांतर्गत या अ‍ॅप्सना जनरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रेस अँड पब्लिशिंग हाऊसकडून लायसन्स प्राप्त करणे अनिवार्य आहे. हेच लक्षात घेऊन आपण 30 जून 2020 पर्यंत हे लायसन्स उपलब्ध करावे. मेनलँड चायनामध्ये सध्या सर्व अ‍ॅप्सचा अ‍ॅप्रुवल नंबर अनिवार्य आहे.