‘या’ कंपनीची धमाकेदार ऑफर ! केवळ ₹ ५३,९१० रुपयांना मिळेल Apple iPhone XR ; घ्या जाणून अधिक माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅपल आयफोन चे आकर्षण आपल्याकडील तरुणाईत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. आता iPhone विकत घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऍमेझॉन इंडिया या ऑनलाईन मार्केट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा Apple iPhone XR डिस्काउंट मध्ये उपलब्ध करून दिला आहे. डिस्काउंट नंतर हा फोन केवळ ५३,९१० रुपयांना मिळेत आहे. केवळ ठराविक काळासाठीच हि ऑफर लागून असल्यामुळे इच्छूकांनी घाई करणे अपेक्षित आहे. iPhone XR ई-कॉमर्स वेबसाइट वर याची मूळ किंमत ५९,९०० रुपये इतकी आहे पण ग्राहक यात १० टक्के डिस्काउंट मिळवू शकतात.

हा १० टक्के फायदा HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे दिला जात आहे. जर उपभोकर्ता HDFC क्रेडिट कार्ड चा वापर करत असेल तर मात्र त्याला चेक आउट च्या वेळी EMI चा ऑप्शन सेलेक्ट करावा लागेल. हि iPhone XR ची आत्तापर्यंतची सगळ्यात कमी किंमत असून बाजारात दाखल झाल्यानंतर त्याची सुरुवातीची किंमत ₹ ७६,९०० इतकी होती. अ‍ॅपल कंपनी भारतीय बाजारात आपल्या उपकरणांची विक्री करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहे कारण भारतीय बाजारात या स्मार्टफोन्स ची किंमत खूप आहे. त्यामुळे कंपनी ला ई-कॉमर्स वेबसाइट वरील लिमिटेड पीरियड ऑफर चा विक्रीसाठी चांगला फायदा होताना दिसतो.

काय आहेत Apple iPhone XR चे फीचर्स :
– A12 Bionic प्रोसेसर: हा अ‍ॅपल चा सर्वात पॉवरफुल प्रोसेसर असून हाच प्रोसेसर अ‍ॅपल च्या सर्वात महाग iPhone Xs Max या स्मार्टफोनमध्ये देखील आहे.
– LCD पॅनल स्क्रीन डिस्प्ले
– १२ मेगापिक्सल रियर कॅमेरा
– ७ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
– बॅटरी बॅकअप : iPhone XR ची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर २ दिवस चालू शकेल.
– IP68 वाटर आणि डस्ट रेसिस्टेंट : यामुळे पाणी आणि धुळीतही तुमचा फोन सुरक्षित राहील.
– वायरलेस चार्जिंग सपोर्ट
– याबरोबर ५W चा चार्जर मिळेल ज्यामुळे चार्जिंग करण्यास उशीर लागू शकतो.

अधिक माहितीसाठी अथवा iPhone XR विकत घेण्यासाठी ‘ऍमेझॉन इंडिया’ ची अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.