Amazon इंडियावर ‘Apple डेज सेल’ ! ‘iPhone’ वर भरमसाठ ‘डिस्काऊंट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅमेझॉन इंडियावर ‘अ‍ॅप्पल डेज सेल’चं आयोजन करण्यात आलं आहे. हा चार दिवसीय सेल ई कॉमर्स वेबसाईटवर लाईव्ह आहे. 11 जानेवारीपर्यंत हा सेल असणार आहे. या सेलमध्ये अ‍ॅप्पल डिव्हाईसेसवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. यात iPhone XR आणि iPhone XS यांचाही समावेश आहे.

अ‍ॅप्पल डेज सेलमध्ये आयफोन 11 हा फोन 64,900 या सुरुवातीच्या किंमतीला उपलब्ध करण्यात आला आहे. ग्राहकांना HDFC कार्ड्सवर 6000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जात आहे. याशिवाय iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max क्रमश: 99,900 आणि 1,09,900 रुपये या सुरुवातीच्या किंमतीपासून उपलब्ध आहेत. या मॉडेलवर ग्राहकांना HDFC बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI ट्रान्झॅक्शनद्वारे 7000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटचा फायदा मिळणार आहे.

iPhopne XR हे अ‍ॅप्पलचं खूपच लोकप्रिय डिव्हाईस आहे. हा भारतातही लोकप्रिय आहे. हा फोन अ‍ॅमेझॉन इंडिया अ‍ॅप्पल डेज सेलमध्ये 49,000 रुपयांना मिळत आहे. याशिवाय HDFC कार्डवर ग्राहकांना 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळणार आहे.

या चार दिवसीय सेलमध्ये iPhone 6s 23,999 रुपयांना विकला जात आहे. ही किंमत 32 GB स्टोरेज व्हॅरिएंटसाठी आहे. सेलमध्ये iPhone XS देखील आहे. ग्राहकांना हा फोन 62,999 रुपयांना मिळत आहे. याशिवाय या सेलमध्ये iPhone 8 भारतात आता 34,999 रुपयांना विकला जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/