खुशखबर ! ‘Apple’ लॉन्च करणार ‘क्रेडिट कार्ड’, कोणतेही ‘अतिरिक्त’ शुल्क नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता अ‍ॅपल ही स्मार्टफोन बनवणारी ओळखली जाणारी कंपनी आता क्रेडिट कार्डच्या व्यवसायात पाऊल टाकले आहे. मंगळवारी कंपनीने आपले क्रेडिट कार्ड लॉन्च केले. विशेष म्हणजे या क्रेडिट कार्डवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. ना कोणतीही लेट फी, ना कोणतेही एनुअल फी आणि ना कोणतेही एक्सचेंज फी. येवढेच नाही तर मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास देखील कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. हे मास्टर कार्ड असणार आहे. अ‍ॅपलने हेच कार्ड गोल्डमॅन सैक्सबरोबर मिळून लॉन्च केले आहे.

अ‍ॅपल आपल्या टाइटेनियम कार्डधारकांच्या खरेदीवर एक टक्के, तर अ‍ॅपल डिजिटल कार्डच्या खरेदीवर दोन टक्के कॅशबॅक देणार आहे. जर अ‍ॅपल कार्डवरुन अ‍ॅपल स्टोरमधून खरेदी केल्यास त्यावर ३ टक्के कॅशबँक मिळणार आहे. परंतू तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने जास्त प्रवास करत असाल तर तुम्हाला पाऊंट्स मिळणार नाही. याशिवाय कंपनीने अ‍ॅप बनवले आहे यातून तुम्ही बँलेंस चेक करु शकतात आणि पेमेंट देखील करु शकतात.

या कार्डमध्ये काही विशेष सिक्योरिटी फिचर्स देण्यात आले आहे, यामुळे यात फसवेगिरी करण्यास अवघड होईल. अ‍ॅपलने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी फेस आयडी आणि टच आयडी अनिवार्य केले आहे.

आयफोन युजर्स वापरु शकतात हे क्रेडिट कार्ड
सध्या या क्रेडिट कार्डला आयफोन यूजर्सच वापर करु शकतील. अ‍ॅण्ड्राइड यूजर्स सध्या या कार्डचा वापर करु शकणार नाहीत. कंपनी लवकरच हे कार्ड सर्व देशांच्या बाजारात उतरवण्याचा तयारीत आहे. अ‍ॅप्पल या क्रेडिट कार्डसाठी गोल्डमॅन सैक्स आणि मास्टरकार्डची मदत घेणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –