केवळ 49 रुपयांत मिळतंय Apple Music चे सबस्क्रीप्शन, मिळेल 90 मिलियन गाण्यांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Apple ने आपल्या अनशील्ड इव्हेंटमध्ये एक विशेष सादरीकरण केले आहे. कंपनीने इव्हेंटदरम्यान Apple Music साठी एकदम नवीन प्लान सादर केले आहे. Apple Music एक प्रकारची म्यूझिक स्ट्रीमिंग सेवा आहे. हा व्हॉईस प्लान याच संदर्भात सादर केला आहे. या प्लानमध्ये सबस्क्रायबर्सला एका महागड्या सबस्क्रिपशन प्लान (Subscription Plan) प्रमाणे अनेक फायदे मिळतात. सध्या Apple द्वारे ऑफर करण्यात येत असलेल्या इंडिव्हिज्युअल प्लानचे स्ट्राईप डाऊन व्हर्जन हे नवीन व्हॉईस प्लान आहे.

 

व्हॉईस आणि सिरी व्हॉईस असिस्टंटचा वापर करून यूजर्स 90 मिलियन गाण्यांची यादी पाहू शकतात; सबस्क्रायबर्सला शेकडो नवीन प्लेलिस्ट मिळतील. इतकेच नव्हे, तुम्ही Apple Music Radio चा सुद्धा लाभ घेऊ शकता.

 

कधी पर्यंत उपलब्ध होईल हा प्लॅन?
अपेक्षा आहे की अ‍ॅपल म्यूझिक व्हॉईस प्लान या वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल. यासाठी (Apple Music) मेंबरशिप शुल्क केवळ 49 रुपये/महिन आहे. अ‍ॅपल त्या नॉन-सबस्क्रायबरसाठी सात दिवसीय मोफत प्रीव्ह्यू देत आहे, जे सिरीच्या माध्यमातून म्यूझिक रिक्वेस्ट करतात. ही ऑटो-रिन्यूव्हल सेवा नसल्याने या सुविधेचा लाभ एकदाच घेता येईल.

सोपे होईल सेवा सदस्यत्व घेणे
सेवा सदस्यत्व घेण्याची प्रक्रिया खुप सोपी आहे. सदस्यत्व दोन प्रकारे घेतला येऊ शकते.
पहिली पद्धत अ‍ॅपलवर Hey Siri, माझे अ‍ॅपल म्यूझिक व्हॉईस ट्रायल सुरू करा’ असे बोलायचे आहे, ज्याद्वारे तुम्ही या सेवेचे सदस्यत्व घेऊ शकता.

 

सदस्यत्व घेण्याची दुसरी पद्धत अ‍ॅपल म्युझिक अ‍ॅप, ज्याद्वोर साईनअप करून सदस्यत्व मिळेल.
एकदा सदस्यत्व मिळाल्यानंतर सबस्क्रायबर्स आपल्या सर्व सिरी-सक्षम डिव्हाईसमध्ये संगीत लावण्याची रिक्वेस्ट करू शकता.
या डिव्हाईसेसमध्ये एयरपॉड्स, होमपॉड मिनी, आयफोन (Apple Music), कारप्ले इत्यादीचा समावेश आहे.

 

Web Title :- Apple Music | apple music subscription new plan at just rupees 49 per month know how you can take subscription

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Bhavana Gawali | …म्हणून शिवसेना खासदार भावना गवळी आज ED कार्यालयात हजर राहणार नाहीत

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट, दुकानांच्या वेळेबाबत सुधारीत आदेश जारी; जाणून घ्या वेळा

Mumbai Crime | मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटीच्या हिरोईनसह महिला तस्कर गजाआड