Samsung Vs Apple : ‘या’ कारणामुळं सॅमसंगला अ‍ॅपलनं दिली तब्बल एक बिलीयन डॉलरची भरपाई, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आयफोनची विक्री जितकी जास्त असेल तितका सॅमसंगला फायदा होतो. आता तुम्ही असा विचार करत असाल की, जर अँपलचा फोन विकला जात असेल तर सॅमसंगला कसा फायदा होत आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आयफोन आपला डिस्प्ले सॅमसंगकडूनच खरेदी करतो. अशात आयफोनच्या विक्रीमुळे सॅमसंगचीही कमाई होते.

आता एक नवीन अहवाल समोर आला आहे, त्यानुसार अँपलने सॅमसंगला भरपाई म्हणून एक बिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे ७,५२७ कोटी रुपये दिले आहेत. खरंतर अँपलने ही भरपाई आयफोनसाठी कमी डिस्प्ले खरेदी केल्यामुळे दिली आहे. याची माहिती डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट (डीएससीसी) च्या अहवालातून मिळाली आहे.

अँपलच्या आयफोनसाठी सॅमसंग ओएलईडी डिस्प्ले पुरवतो. यावर्षी संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आयफोनच्या विक्रीवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे अँपलने कमी डिस्प्ले खरेदी केले आहेत आणि यामुळेच अँपलला ही नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. वास्तविक दरवर्षी अँपल आणि सॅमसंग मध्ये निश्चित प्रमाणात डिस्प्ले खरेदी करण्याचा करार केला जातो आणि निश्चित प्रमाणात डिस्प्ले खरेदी न केल्यास भरपाई द्यावी लागते.

अँपलने याच कारणास्तव मागील वर्षी देखील सॅमसंगला मोठी रक्कम दिली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या नुकसान भरपाईनंतर सॅमसंगला फायदा झाला आहे, जेव्हा कंपनी तोट्यात चालली होती. मागील वर्षी अँपलने सॅमसंगला डिस्प्ले खरेदी न केल्याबद्दल ६८४ बिलियन डॉलर्स दिले होते.