सफरचंदाच्या बिया आहेत धोकादायक, चूकूनही खाऊ नका

पोलीसनामा ऑनलाइन – सर्व फळांमध्य सफरचंद सर्वाधिक गुणकारी, लाभदायक आहे. रोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र, याच गुणकारी सफरचंदाच्या बिया आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. धक्कादायक म्हणजे काही दिवस सतत सफरचंदच्या बिया खाण्यात आल्यास जीवही जाऊ शकतो. कारण सफरचंदामधील अमिगडलिन नावाचा घटक पाचकरसासोबत मिळून विष तयार करतो. ज्यामुळे जीवही जाऊ शकतो.

सफरचंदाच्या बिया सतत खाल्ल्यास जीव जाण्याचा धोका जास्त असतो, हे ऐकल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल. पण, ते खरे आहे. सफरचंदाच्या बिया खाल्ल्याने हृदय आणि मेंदूला नुकसान होऊ शकते. या बिया खाल्ल्याने लो ब्लड प्रेशरची शक्यता वाढते. यामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो. तसेच चक्कर येणे किंवा डोकेदुखीची समस्या होऊ शकते. या बिया पोटात गेल्यानंतर काही लोकांना उलटी किंवा पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/