दहशतवाद्यांच्या धमक्यांना ‘त्यानं’ मारला ‘फाटा’, दररोज 500 ट्रक ‘अ‍ॅपल’ काढतोय काश्मीरमधून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दहशतवाद्याकडून मिळणाऱ्या धमक्यांना न जुमानता जवळपास 500 ट्रक दररोज काश्मीर खोऱ्यातून राज्याच्या बाजारात येत आहे. यामुळे त्या बागायत दारांना मोठा दिलासा मिळाला आहे जे काश्मीरमधील प्रतिबंधमुळे चिंतेत होते.

स्थानिक बाजाराच्या माहितीनुसार सरकारी संस्था नेफेडच्या खरेदीने बागायतदारांना आधार मिळाला आहे. ते म्हणाले की सरकारच्या आग्रहामुळे जर नेफेडने सफरचंद खरेदी करण्याचे पाऊल उचलले नसते तर खूप नुकसान झाले असते. सरकारने घोषित केलेल्या किमान आधारभूत किंमतीने देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे दहशतवादी आपली दहशत कायम ठेवण्यासाठी सतत धमक्या देत आहेत. त्यामुळे चालू वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात सफरचंदच्या व्यवसायात जवळपास 30 हजार टनची कमी आली आहे. मागील वर्षी व्यवसायिकांनी 80 हजार टनचा व्यवसाय केला. या वर्षी हा आकडा 50 हजारपेक्षा कमी झाला. याचे कारण हे आहे की दहशतवादी ना की फक्त बागायतदारांना धमकवत आहेत तर मारहाण करण्याबरोबरच फळांनी भरलेले ट्रक पुढे जाऊ देत नाहीत.

दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात एका व्यापाऱ्यांने सांगितले की त्यांनी रात्री फळांनी भरलेला ट्रक नवी दिल्लीला नेला आणि तेथे विक्री करुन त्यांना 60 हजार रुपये मिळाले. परंतू घरी आल्यावर दहशतवाद्यांनी त्यांना संपर्क करुन सांगितले की कोणतातरी एक पर्याय निवडा. एक तर त्यांच्या ट्रकला आग लावावी किंवा ते पायात गोळी खाण्यासाठी तयार रहा. शेवटी दहशतवाद्यांनी ट्रकला आग लावली. आता ट्रकच्या दुरुस्तीला दीड लाख रुपये लागतील. त्यानंतर हा व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातारण आहे.
पोलिसांनी सांगितले की सप्टेंबर दरम्यान दहशतवाद्यांच्या धमक्या आणि मारहाणीच्या 40 पेक्षा जास्त घटना समोर आल्या.

श्रीनगरच्या सिविल लाइंस भागात जवाहर नगर बाजारमधील एक व्यवसायिक रियाज वानी यांनी सांगितले की, आम्ही स्थानिक मस्जिदीने जी वेळ निश्चित केली आहे त्या वेळेनुसार सकाळी दुकान उघडतात आणि नऊ वाजता बंद करतो परंतू यानंतर संध्याकाळी 6 वाजता दुकान उघडतो आणि रात्री 10 वाजता बंद करतो.