Apple TV+ साठी प्रत्येक महिन्याला फक्‍त 99 रूपये, ‘या’ ग्राहकांना मिळणार वर्षभर ‘एकदम’ फ्री सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील प्रमुख मोबाईल उत्पादक कंपनी अ‍ॅपलने 10 तारखेला आपले नवीन फोन iPhone 11, iPhone 11 Pro and iPhone 11 Pro Max लाँच केले. त्याचबरोबर आपली आणखी काही नवीन उत्पादने देखील बाजारात आणण्याची घोषणा केली. यामध्ये कंपनीने ओरिजिनल व्हिडीओ सर्व्हिस, अ‍ॅपल टीव्ही आणि गेम सबक्रिप्शन लाँच करण्याच्या तारखेची देखील घोषणा केली.

1)ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्विस Apple TV+
ही सर्व्हिस 1 नोव्हेंबरपासून संपूर्ण जगभर लाँच केली जाणार आहे. यासाठी भारतीयांकडून प्रत्यक्ष महिन्याला 99 रुपये घेतले जाणार आहेत. यामध्ये सर्व ओरिजिनल व्हिडीओ दाखवले जाणार आहेत. सुरुवातीला ग्राहकांना 7 दिवस फ्री ट्रायल म्हणून मिळणार आहेत. मात्र त्यानंतर प्रत्येक महिन्याला 99 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

2)Family Sharing फीचर
Apple TV+ मध्ये तुम्हाला फॅमिली शेअरिंग फिचर देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही एकाच कुटुंबातील 6 व्यक्ती हे एकाचवेळी वापरू शकता. 40 हुन अधिक भाषेत तुम्हाला या व्हिडिओची मजा घेता येणार आहे.

3) या ग्राहकांना मिळणार 1 वर्ष मोफत सेवा
Apple TV+ या फीचरला Apple TV अ‍ॅप द्वारे कंट्रोल केले जाणार आहे. हि सुविधा तुम्हाला iPhone, iPad, Apple TV 4K, Apple TV HD, Apple TV iPod touch आणि Mac या साधनांवर उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आयफोन, आयपॅड, आयपॉड यांसारखी वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हि सेवा एक वर्षभर मोफत दिली जाणार आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like