‘Apple’ व्हाईस असिस्टंट समजुन घेणार तुमच्या ‘भावना’, चेहर्‍यावरील हावभावावरून घेईल ‘कमांड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत गुगल असेल किंवा अ‍ॅपलचा व्हॉइस असिस्टंट तुमचा आवाज ऐकून कमांड घेतो परंतू आता वेळ बदलली आहे. कारण अ‍ॅपल व्हाइस असिस्टंट सीरी तुमचा चेहरा वाचून किंवा इमोशन समजून कमांड घेईल. अ‍ॅपलद्वारे दाखल करण्यात आलेल्या नव्या पेटेंट बाबत भविष्यात यात आर्टिफिशिअल असिस्टंट सीरीचे नवे व्हर्जन फेशिअल एक्सप्रेशन युजरच्या भावना समजण्यास सक्षम असेल.

अमेरिकन टेक कंपनीकडून फाइल करण्यात आलेल्या एक नव्या पेटेंटमध्ये समोर आले की AI व्हॉइस असिस्टंट सीरीचे फ्यूचर व्हर्जन आपल्या यूजरच्या चेहऱ्यावर येणाऱ्या एक्सप्रेशन आणि त्यांचे इमोशन देखील समजू शकतील. यूजर जेव्हा कमांड देईल तेव्हा सीरी त्यांचे इमोशन देखील समजून घेण्याचा प्रयत्न करेल. अ‍ॅपलच्या मते अनेकदा व्हाइस असिस्टेंड व्हाइस कमांडला समजू शकत नाही परंतू इमोशनला समजल्यानंतर व्हाइस कमांड समजून घेणे सहज शक्य होईल.

अ‍ॅपलने आपल्या पेटेंट मध्ये म्हणले आहे की एखाद्या परिस्थितीत इंटेलिजेंट सॉफ्टवेअर एजेंटकडून घेण्यात येणाऱ्या अ‍ॅक्शन यूजरच्या आवश्यकतेनुसार मिळणाऱ्या कमांडने मॅच करत नाही. नवीन सिस्टिम सीरीसाठी आणखी एक व्हेरिफिकेशन लेअर अ‍ॅड करण्यात येईल आणि असिस्टंट यूजरच्या रिक्वेस्टला त्याच्या इमोशनच्या हिशोबाने समजून घेईल.

कोडिंग सिस्टमने कळेल मूड
डेटा अ‍ॅनालिसिसनुसार यूजरचा मूड समजून घेण्यात येईल. यासाठी मायक्रोफोन, ऑडिओ इनपूट, कॅमरा आणि त्यातून मिळणाऱ्या इमेजच्या मदतीने इमोशन समजून घेतले जातील. सध्या या पेटेंटवर काम चालू आहे आणि जर यात यश आले तर अ‍ॅपलच्या येणाऱ्या डिव्हाइसमध्ये यूजर्सला या फीचरचा लाभ घेता येईल.

Visit : Policenama.com