तंत्रज्ञानाची कमाल ! ‘अ‍ॅपल स्मार्टवॉच’नं वाचवला त्याच्या वडिलांचा ‘जीव’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्याच्या धावपळीच्या युगात तंत्रज्ञान मानवासाठी अनेकप्रकारे वरदान ठरत आहे. दैनंदिन जीवनातील अनेक कामे त्यामुळे सहज आणि सोपी होत आहेत. मात्र अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण एका अ‍ॅपल कंपनीच्या स्मार्टवॉच मुळे वाचले आहेत. होय, एका अ‍ॅपल वॉच वापरकर्त्याने त्याच्या वडिलांचे प्राण वाचवल्याबद्दल अ‍ॅपल कंपनीचे आभार मानले आहेत.

दरम्यान, वॉशिंग्टनमधील ‘गेड ब्रूडेट’ याने वॉशिंग्टन अ‍ॅपल स्मार्टवॉचने त्याच्या वडिलांचे प्राण वाचवल्याचा असा दावा करत तशी एक पोस्ट त्याने फेसबुकवर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये कंपनीचे कौतुक केले आहे. या पोस्टला थेट अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करून अनुभव शेअर केल्याबद्दल वापरकर्त्याच्या आभार मानले आहेत.

अशी घडली घटना, वाचले प्राण :
गेड ब्रूडेट हा अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे राहतो. तो माउंटेन बाइकिंग करत असताना रिव्हरसाइड स्टेट पार्क येथे ठरलेल्या ठिकाणी वडिलांची वाट बघत असताना त्याला त्याच्या वडिलांच्या अ‍ॅपल वॉचवरून ‘हार्ड फॉल’ असा एक मेसेज आला. संकटप्रसंगी केल्या जाणाऱ्या या मेसेजमध्ये वडिलांचे लोकेशन देखील पाठवले गेले होते. या मेसेजची दखल घेत ब्रूडेटच्या वडिलांचा अपघात झाला आहे, हे लक्षात घेऊन अ‍ॅपल वॉचने एमर्जेन्सी नंबर ९११ वर मेसेज पाठवून वैद्यकीय मदत मागितली. त्यामुळे ३० मिनिटांमध्ये रूग्णवाहिका येऊन ग्रेडच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.

दरम्यान, या मेसेजमुळे वडिल कुठल्यातरी संकटात अडकले असल्याची माहिती गेड ब्रूडेट याला मिळाली. तो गुगल मॅपच्या मदतीने वॉचमधून मिळालेल्या लोकेशनवर पोहोचला. तेथे पोहोचेपर्यंत त्याच्या वडिलांना ‘सेक्रेड हर्ट मेडिकल सेंटर’मध्ये नेण्यात आल्याचा आणखी एक मेसेज आला. यानंतर त्याची काळजी मिटली. त्याच्या वडिलांचा जीव वाचला होता.

त्यानंतर त्याने फेसबुक वर एक पोस्ट टाकली ज्यात कंपनीचे आभार मानताना त्याने म्हटले, “अ‍ॅपल कंपनीकडे कमालीचे तंत्रज्ञान आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनेच माझ्या वडिलांचे प्राण वाचले. याबद्दल मी कंपनीचे आभार मानतो. ”

Visit : policenama.com