Apple च्या घड्याळाच्या ‘या’ पद्धतीमुळे वाचले युवकाचे प्राण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Apple ची प्रत्येक वस्तू लोकांमध्ये लोकप्रिय आहे. फोन पासून ते घडाळ्यापर्यंत सर्व वस्तू लोकांना पसंत पडत आहेत. त्याचबरोबर आता Apple च्या स्मार्ट घड्याळाने अमेरिकेत एका व्यक्तीचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. शिकागो स्काईलाइनचा फोटो घेण्यासाठी हा व्यक्ती जेट स्की रायडींग करत होता. त्याचवेळी एक मोठी लाट या व्यक्तीला येऊन धडकली आणि यामुळे तो थेट पाण्यात पडला. त्याचवेळी त्याचा फोन देखील पाण्यात पडला. मात्र त्याची मदत करण्यासाठी आजूबाजूला कुणीही नव्हते. त्याचवेळी त्याच्या Apple च्या घड्याळातील SOS फीचरने त्याचा जीव वाचवला.

एका खासगी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, फिलिप एशो असे या व्यक्तीचे नाव असून तो समुद्रात जेट स्की करत होता. त्याचवेळी एका मोठ्या पाण्याच्या लाटेने त्याला थेट समुद्रात ओढले. त्याचवेळी त्याचा फोनदेखील पाण्यात पडल्याने त्याला मदतीसाठी काहीही करता आले नाही. त्याने इतरांना आवाज दिला मात्र पाण्याच्या आवाजाने त्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचू शकला नाही. त्याचबरोबर पाणी त्याला हळूहळू समुद्राच्या तळाशी घेऊन चालले होते. त्याचवेळी त्याने आपल्या ऐपल घड्याळाच्या SOS इमर्जन्सी फीचरची मदत घेऊन ९११ या क्रमांकावर फोन केला. सुरुवातीला त्याचा फोन लागला नाही मात्र त्यानंतर त्याचा फोन लागला आणि बचाव पथकाने येऊन त्याची सुटका केली.

दरम्यान, अशाचप्रकारे अमेरिकेत एका व्यक्तीने रेस्टोरंटमध्ये या घड्याळाच्या मदतीने एका युवकाचे प्राण वाचवले होते. या युवकाने हे घड्याळ हातात घातले होते. त्यामुळे डॉक्टरांना त्याला एट्रियल फिब्रिलेशन झाल्याचे निष्पन्न झाले होते आणि त्यामुळे उपचारांमध्ये मदत झाली होती.

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी