स्थायी सभापतीसाठी विलास मडेगिरी, मयूर कलाटे यांचा अर्ज दाखल

पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीसाठी सत्ता असलेल्या भाजपकडून नगरसेवक विलास मडिगेरी यांचा उमेदवारी अर्ज आज प्रशासनाकडे दाखल करण्यात आला. भाजपचेच नगरसेवक शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सभापतीपदासाठीची निवडूकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.

भाजपचे वरीष्ठ नेते ही निवडणूक होऊ नये, यासाठी मडिगेरी की शिंदे यांपैकी कोणाला आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मागील वर्षी स्थायी समिती सभापती करीता शीतल शिंदे तीव्र इछुक असतांना त्यांना ते पद मिळाले नाही. त्यानंतर मागच्या वेळेस शीतल शिंदे यांनी समिती सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. या वेळेस ही इछुक असतांना पक्षाने त्याना परत डावलून विलास मडिगेरी यांचा उमेदवारी अर्ज प्रशासनाकडे सादर केला. मात्र यावेळी माघार घ्यायची नाही असा निर्णय घेत शीतल शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा घेत आपला अर्ज प्रशासनाकड़े सादर केला असल्यास शीतल शिंदे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहीती दिली आहे.

सभापतीपदासाठी नगरसेवक शीतल शिंदे, संतोष लोंढे, आरती चोंधे हे तीघेजण इच्छुक होते. या तिघांपैकी शीतल शिंदे यांना भाजपा उमेदवारी देतील असे मानले जात होते. परंतु, महापालिकेत सत्ताधारी भाजपने अचानकपणे विलास मडिगेरी यांचे नाव पुढे केले आहे.

शहर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची मन जिंकण्यात शीतल शिंदे यंदाही अपयशी ठरले आहेत. भाजपा चे स्थायी सदस्य नगरसेवक यांनी शीतल शिंदे यांनी पक्षाच्या आदेशाला न जुमानता निवडणुकीत माघार नाही घेतली आणि जर राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा पाठिंबा मिळाला तर शीतल शिंदे यांचा सभापती पदाचा मार्ग कठीन राहणार नाही.